यावलमध्ये रंगला संगीतमय पाडवा पहाट कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 03:48 PM2018-11-10T15:48:27+5:302018-11-10T15:49:07+5:30

पाडव्याच्या दिवशीची शहरवासीयांची पहाट संगीतमय पाडवा पहाट कार्यक्रमाने रंगली.

This is the colorful musical Padva dawn program | यावलमध्ये रंगला संगीतमय पाडवा पहाट कार्यक्रम

यावलमध्ये रंगला संगीतमय पाडवा पहाट कार्यक्रम

Next
ठळक मुद्देदर्जेदार भक्तीगीते, भावगीते, गवळणसारख्या गीतांनी उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळविली.पहाटेच्या गुलाबी थंडीतही रसिक श्रोत्यांची उपस्थिती चांगली होती.

यावल, जि.जळगाव : पाडव्याच्या दिवशीची शहरवासीयांची पहाट संगीतमय पाडवा पहाट कार्यक्रमाने रंगली. पहाटे सहाला आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वालन होऊन कार्यक्रमास सुरवात झाली.
रावेर येथील प्रभुदत्त मिसर व त्यांच्या सहकारी कलावंतांनी सादर केलेल्या दर्जेदार भक्तीगीते, भावगीते, गवळणसारख्या गीतांनी उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळविली.
शहरात प्रथमच पाडवा पहाटनिमित्त संगीतमय मैफिलीचा कार्यक्रम झाल्यामुळे पहाटेच्या गुलाबी थंडीतही रसिक श्रोत्यांची उपस्थिती चांगली होती. विशेष म्हणजे आमदार हरिभाऊ जावळे पहाटे पावणेसहापासून कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित होते.
रावेर येथील संगीत शिक्षक प्रभुदत्त मिसर यांच्यासोबत संजय मिसर यांनी तबला वादनाची साथसंगत देत उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. तसेच हरेश पंडित (तबला), प्रेषित मिसर (टाळ व घुंगरू) यांनी उत्तम साथसंगत दिली.
याप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांची स्तुती करीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रमोद कोळंबे यांनी आमदार जावळे व प्रभुदत्त मिसर यांचे शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन स्वागत केले. या वेळी सरोज कोळंबे यांनी कविता वाचन केले. प्रमोद कोळंबे व परिवारातर्फे शहरात प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष वैद्य यांनी केले.


 

Web Title: This is the colorful musical Padva dawn program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.