प्रेमाच्या रंगात केला बेरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:28 AM2020-12-03T04:28:29+5:302020-12-03T04:28:29+5:30

तलाठी पत्नीचा खून करून निलंबित पोलिसाने केला घात श्यामकांत सराफ लोकमत न्यूज नेटवर्क पाचोरा : प्रवासात प्रेम जडले, ...

Colorless in the color of love | प्रेमाच्या रंगात केला बेरंग

प्रेमाच्या रंगात केला बेरंग

Next

तलाठी पत्नीचा खून करून निलंबित पोलिसाने केला घात

श्यामकांत सराफ

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचोरा : प्रवासात प्रेम जडले, प्रेमाचे विवाहात रूपांतर होत अखेर तीन वर्षातच प्रेमाच्या रंगात बेरंग करीत तलाठी पत्नीचा खून करून निलंबित पोलिसाने घात केल्याची बाब समोर आली आहे.

नितीन मोतीराम पवार हा मुंबई पोलीस दलात असताना रेल्वेने प्रवास करताना अरुणा परशुराम ठाकरे ह्या तलाठी महिलेशी ओळख होत प्रेम जडले. अरुणा ठाकरे ह्या आदिवासी भिल्ल समाजाच्या असताना मीपण भिल्ल समाजाचा असल्याचा बनाव करीत लग्नाच्या बेडीत अडकवले. नितीन पवार याचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट होऊन त्यास पाच वर्षांचा मुलगा असताना विनाअट तलाठी ठाकरेशी नोंदणीकृत विवाह केला. पवार २०१९च्या डिसेंबर महिन्यात एका महिला कॉन्स्टेबलशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी निलंबित झाल्याचे समजते.

मुलाचा सांभाळ करण्याचा आग्रह धरून नव्याने अपत्य प्राप्तीस नकार होता. त्यातच पत्नी अरुणा ही माहेरी पगार देते यावरून पती-पत्नीत भांडणे होत असल्याचीही कुजबुज ऐकायला मिळाली. यावरूनच नितीन पवार याने पत्नीचा कायमचा काटा काढल्याची चर्चा आहे. मयत अरुणा ठाकरे पवार हिला डोक्यावर वार करून मारले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. जिन्यावरून पाय घसरून खाली पडल्याचा बनाव पती नितीन पवार याने केला. मात्र डोक्याव्यतिरिक्त अंगावर कुठेही खरचटल्याच्या जखमा नसल्याने संशय बळावला. घटना घडली त्या ठिकाणी शेजाऱ्यांनाही महिला जिन्यावरून पडल्याची जाणीव झाली नाही. यावरून पतीनेच मुलीचा खून केला आहे, असे मयतीच्या आईने पोलिसात तक्रारीत म्हटले आहे.

भुसावळला अंत्यसंस्कार

मयत तलाठी अरुणा ठाकरे-पवार हिच्यावर माहेरी भुसावळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन मोतीराम पवार याची आईदेखील जातिभेद करून तिला लासलगाव येथे थांबू देत नव्हती, असेही नातेवाइकांचे म्हणणे आहे. नितीन यास पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Colorless in the color of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.