चाळीसगावच्या आ. बं. विद्यालयाचे प्रांगण झळाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 04:23 PM2018-12-18T16:23:44+5:302018-12-18T16:25:12+5:30
माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून शतकोत्तर शैक्षणिक वारसा असणाºया आ.बं.विद्यालयात सद्य:स्थितीत विविध विकास कामे सुरू असून, शाळेचे रुपडे आकर्षक होत आहे. नुकतेच शाळेच्या प्रांगणात सायंकाळी खेळाचा सराव करणाºया विद्यार्थ्यांसाठी हायमास्ट दिव्यांची व्यवस्थाही पूर्णत्वास गेली आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून शतकोत्तर शैक्षणिक वारसा असणाºया आ.बं.विद्यालयात सद्य:स्थितीत विविध विकास कामे सुरू असून, शाळेचे रुपडे आकर्षक होत आहे. नुकतेच शाळेच्या प्रांगणात सायंकाळी खेळाचा सराव करणाºया विद्यार्थ्यांसाठी हायमास्ट दिव्यांची व्यवस्थाही पूर्णत्वास गेली आहे. खासदार ए.टी.पाटील यांच्या खासदार निधीतून हायमास्ट दिवे बसविण्यात आले. संस्थेच्या बांधकाम समितीचे चेअरमन व युवा उद्योजक योगेश अग्रवाल यांच्या हस्ते दिव्यांचे लोकार्पण झाले. यामुळे आ.बं.विद्यालयाचे प्रांगण हायमास्ट दिव्यांच्या प्रकाशाने झळाळून निघाले आहे.
विद्युत दिव्यांची सोय झाल्याने क्रीडा स्पर्धांसाठी सराव करणाºया विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. चाळीसगावशिक्षण संस्था ही पंचक्रोशीची ज्ञान गंगोत्री असून, आ.बं. विद्यालयाची इमारत ११० वर्षे जुनी असल्याने ऐतिहासिक वारसा म्हणून आम्ही तो जतन करणार आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेऊन शाळा परिसरात वेगवेगळ्या सुविधा पुरविण्यास इमारतीचे नूतनीकरण सुरु आहे. यासाठी माजी विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. संस्थेच्या मॅनेजिंग बोडार्चे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे सुरू असल्याचे यावेळी योगेश अग्रवाल यांनी सांगितले.
भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, संघटन सरचिटणीस प्रा.सुनील निकम, मुख्याध्यापिका निर्मला झोपे, प्रवीण राजपूत, पंकज साळुंखे, मनोहर सूर्यवंशी, दिनेश महाजन व इतर शिक्षक वृंदही उपस्थित होते.