ये ग ये ग माझे चिऊताई, सुखे दाणा-पाणी घेई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:48 AM2021-01-08T04:48:11+5:302021-01-08T04:48:11+5:30

जळगाव : ‘चिमणीसाठी घर आणि तिचे पुनर्वसन’ या ध्येयाने काम करणा-या स्पॅरोताई फाउंडेशनकडून नवीन वर्षात दिनदर्शिकेच्या माध्यमातून चिमणी वाचविण्याचा ...

Come on in, take a look and enjoy yourself! | ये ग ये ग माझे चिऊताई, सुखे दाणा-पाणी घेई...

ये ग ये ग माझे चिऊताई, सुखे दाणा-पाणी घेई...

Next

जळगाव : ‘चिमणीसाठी घर आणि तिचे पुनर्वसन’ या ध्येयाने काम करणा-या स्पॅरोताई फाउंडेशनकडून नवीन वर्षात दिनदर्शिकेच्या माध्यमातून चिमणी वाचविण्याचा संदेश दिला जात आहे. यासाठी निवृत्त कला शिक्षक लिलाधर कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे.

शहरातील अपार्टमेंट संस्कृतीने चिमणीचा आपल्या घरातील येण्याचा व जाण्याचा मार्गच बंद करून टाकला आहे. आपल्या घरात किंवा घराच्या बाल्कनीमध्ये चिमणीला तिच्या घरट्यासाठी जागा मिळावी. तसेच तिला हक्काचा निवारा मिळून चिमणीचे संवर्धन व्हावे यासाठी फाऊंडेशनचे कार्य सुरू आहे.

दिनदर्शिकेत महिन्यानुसार दिला संदेश

जानेवारी : खेळ होतो तुमचा, जीव जातो आमचा

फेब्रुवारी : कोंडून पिंज-यात आम्हाला करता त्रस्त

मार्च : नका तोडू हिरवी झाडे, स्मशानात गेली आमची हाडे

एप्रिल : गुढी उभारू नव्या संकल्पाची, करूया तयारी चिऊच्या स्वागताची

मे : वैशाखाचा वणवा, भयकर ऊन, ठेवाल ना पाणी? जाईन दोन घोटे पिऊन

जून : शिकण्यास चिमणीचा धडा, बाळांना शाळेत धाडा

जुलै : धो धो पाऊस, सोसाट्याचा वारा, उडाले घरटे... द्याल ना निवारा?

ऑगस्ट : मंत्र हा स्वातंत्र्याचा, तुमचा-आमचा सर्वांचा

सप्टेंबर : देव बाप्पा देव बाप्पा, नवसाला पाव. आमच्या बाळांच्या रक्षणाला धाव

ऑक्टोबर : देऊनी चिऊताईला आसरा, करूया साजरा सण दसरा

नोव्हेंबर : ना दिवसाचे सुख, ना रात्रीचा आराम. फटाक्याच्या आवाजाने जिणे झाले हराम

डिसेंबर : समतोल राखण्यासा निसर्गाचा, होऊ दे चिवचिवाट चिऊताईचा

काय आहेत फाउंडेशनची उद्दिष्ट्ये

१) पक्षी वाढीस पोषक वातावरण तयार करणे

२) पक्ष्यांच्या चारा व पाण्याची व्यवस्था करणे

३) पक्ष्यांना स्वैर बागडता येण्यासाठी प्रयत्न करणे

४) शहरी भागात पक्ष्यांच्या निवा-याची व्यवस्था करणे

५) हिरवा चारा, फुले, फळे देणा-या देशी वृक्षांची लागवड करणे

६) पक्षी गाव निर्माण करणे

७) निसर्ग व मानवातील नाते दृढ करणे

८) पक्ष्याची शिकार थांबविणे

९) पक्षी संग्रहालय व ग्रंथालयाची निर्मिती करणे

१०) आहत पक्षी उपचार केंद्र उभारत त्यासाठी जनजागरण मंच उभा करणे

११) पक्षी जीवन विमा ‘संकल्पना राबवित, पक्षी रक्षणासाठी कार्य करणा-याचा गौरव करणे

Web Title: Come on in, take a look and enjoy yourself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.