सेेनेत येतो, विधानसभेची उमेदवारी देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:39+5:302021-05-31T04:12:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील भाजपचे नगरसेवक पक्ष सोडून जात असताना, आता माजी मंत्री गिरीश महाजन यांचे ...

Comes to the army, will he run for the Vidhan Sabha? | सेेनेत येतो, विधानसभेची उमेदवारी देणार का?

सेेनेत येतो, विधानसभेची उमेदवारी देणार का?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेतील भाजपचे नगरसेवक पक्ष सोडून जात असताना, आता माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या भाजपतील एका ज्येष्ठ नगरसेवकाने काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. भाजपच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवण्याची तयारीदेखील या नगरसेवकाने दर्शविली आहे. मात्र त्यासाठी विधानसभेची उमेदवारी आपल्या कुटुंबातील सदस्यांना द्यावी अशी मागणी केल्याची माहिती भाजप व शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ही माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांना समजल्यानंतर महाजन त्यांनी दोन दिवसांपूर्वीच संबंधित नगरसेवकाला फोन करून चांगलेच कडक शब्दात सुनावले.

महापालिकेतील भाजपमधील दररोज बदलणाऱ्या या राजकीय समीकरणामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण आता चव्हाट्यावर आले आहे. काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी असलेल्या भाजपमधील नगरसेवक फुटीचे ग्रहण सुरूच असून आता गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या नगरसेवकांनीच भाजप सोडून जाण्याची तयारी दर्शवली असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

संबंधित नगरसेवकाच्या समर्थकांनी आधीच केला सेनेत प्रवेश

माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या या नगरसेवकाच्या इतर समर्थक नगरसेवकांनी मार्च महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला आहे. तेव्हापासूनच संबंधित नगरसेवकदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यावेळी काही मुद्द्यांवर बोलणी फिस्कटल्याने हा प्रवेश रखडला होता. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भेटीत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकाने शिवसेना प्रवेशासोबतच विधानसभेची निवडणूकदेखील लढण्यासाठी तिकिटाची मागणी केली होती. या बैठकीत पालकमंत्र्यांनी विधानसभेचे तिकीट देण्याबाबत कोणतेही आश्वासन दिले नसले तरी शिवसेनेत यायला या नगरसेवकाचे स्वागत करण्यास पालकमंत्र्यांनी तयारी दर्शवली असल्याचीही माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.

महाजनांनी घेतली नगरसेवकाची शाळा

संबंधित नगरसेवकाने शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळाल्यानंतर, शुक्रवारी गिरीश महाजन यांनी संबंधित नगरसेवकाला या भेटीबाबतची विचारणा केली. तसेच नाराजी जाणून घेत पक्षाने दिलेल्या पदांची जाणीव करून देत चांगलेच खडे बोल सुनावले. या सर्व घटनाक्रमानंतर संबंधित नगरसेवक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: Comes to the army, will he run for the Vidhan Sabha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.