‘बेटी बचाव-बेटी पढाव’ चा संदेश देणारी डिजिटल गुडीया कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 01:43 PM2017-04-12T13:43:42+5:302017-04-12T13:43:42+5:30
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे सन्मान झालेल्या डिजिटल गुडीया कोमात गेल्याने मानवी गुडीया वाचवण्याच्या अभियानाचा फज्जा उडालेला आहे.
Next
जिल्हाधिका:यांची बदली होताच दुर्लक्ष : शासकीय अधिका:यांकडून उद्देशाला ‘दे धक्का’
ऑनलाईन लोकमत विशेष /संजय पाटील
अमळनेर, दि.12- ‘बेटी बचाव , बेटी पढाव’ मोहिमेसाठी जळगाव जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. देशभरात सर्वाचे आकर्षण ठरलेली आणि पंतप्रधान व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे सन्मान झालेल्या डिजिटल गुडीया कोमात गेल्याने मानवी गुडीया वाचवण्याच्या अभियानाचा फज्जा उडालेला आहे.
जळगावच्या तत्कालिन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी शासनाच्या ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ या मोहिमेला अधिक चालना दिली. जिल्ह्यातील कमी होत असलेला मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम म्हणून बोलणारी डिजिटल गुडीया तयार केली. यासा:याची दखल केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्याकडून कौतुक झाले होते. जिल्हाधिका:यांनी ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी सर्व उपविभागीय, तहसील, नगरपालिका, पंचायत समित्या , ग्रामीण रुग्णालय, बांधकाम विभाग, कृषी विभागात डिजिटल गुडीया लावण्याचे आदेश काढले. या कार्यालयात येणा:या प्रत्येक नागरिकानी ही संकल्पना पहावी व बेटी बचाव साठी जनजागृती व्हावी, असा त्यामागील उद्देदेश होता. नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे गुडीयाच्या हातातील पाटी मधील दूरदर्शन संचातुन ‘बेटी बचाव बेटी पढाव’ बाबत जागृती करण्यात आली. मात्र तांत्रिक सुविधेअभावी अवघ्या दोन दिवसानंतर ही गुडीया मुकी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही संदेश यात होते म्हणून विविध निवडणुकांच्या आचार संहिता लागल्याने डिजिटल गुडीया बंद करण्यात आली. अधिका:यांच्या कार्यालयात नागरिकांच्या समस्या, तक्रारी, मोर्चे ,बैठका यांच्या वर्दळीमुळे गुडीयाचा आवाज नकोस झाला. कामात अडथळा नको म्हणून म्हणून ते बंद करण्यात आले. नंतर कार्यालयातील शिपायानीही कधी गुडीयाला बोलते केले नाही. त्यातच जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची शिर्डी येथे बदली झाली. जिल्हाधिका:यांच्या बदलीसोबतच डिजिटल गुडीया ही संकल्पना देखील मागे पडली. यासा:यात शासनाने या डिजिटल गुडियावर केलेला खर्च हा वाया जात आहे. लोकमत ने केलेल्या सर्वेक्षणात सर्वच कार्यालयातील गुडीया मुक्या झालेल्या आहेत. दरम्यान या गुडीया कार्यालयाच्या बाहेर आवारात लावाव्यात आणि दररोज सुरु ठेवाव्यात अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे