दिलासा...शहरात कोरोनाची रुग्णसंख्या ५० च्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:15 AM2021-05-17T04:15:05+5:302021-05-17T04:15:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाचा आलेख घसरत असून रविवारी कोरोनाचे ३४ रुग्ण आढळून आले आहे. गेल्या चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचा आलेख घसरत असून रविवारी कोरोनाचे ३४ रुग्ण आढळून आले आहे. गेल्या चार दिवसापासून रुग्णसंख्या ही कमी कमी होत आहे. दुसरीकडे दुपटीने ७९ रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी जामनेर वगळता सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक चित्र होते. मृतांची संख्याही आता घटत आहे.
शहरातील तीन बाधितांचा मृत्यू झाला असून यासह जळगाव तालुक्यातील २, यावल तालुक्यातील २, जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील लक्षणे असलेल्या बाधितांची संख्या आता घटत आहे. शिवाय गंभीर रुग्णांची संख्याही कमी झालेलेली आहे. मात्र, प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण घटविले आहे. रविवारी २५०५ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या तर १८७५ अहवाल आले.
सक्रिय रुग्ण ९६९६
लक्षणे असलेले २०३८
लक्षणे नसलेले ७६५८
जीएमसीत १४ मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी २४ तासात १४ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. यात ३ रुग्ण हे कोरोना निगेटिव्ह होते तर ११ रुग्ण कोरोना बाधित होते. यामुळे मृतांच्या नातेवाईकांचीही मोठी गर्दी होत असल्याची स्थिती रविवारी होती.