दिलासा... शहरातील रुग्णसंख्येचा आलेख घसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:21+5:302021-04-04T04:16:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मार्च महिन्याच्या मध्यंतरी ४५०च्या पुढे गेलेली जळगाव शहरातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी ...

Comfort ... The graph of the number of patients in the city is declining | दिलासा... शहरातील रुग्णसंख्येचा आलेख घसरतोय

दिलासा... शहरातील रुग्णसंख्येचा आलेख घसरतोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मार्च महिन्याच्या मध्यंतरी ४५०च्या पुढे गेलेली जळगाव शहरातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे. गेल्या १० दिवसांची आकडेवारी पाहिली असता एकूण रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. शिवाय २७ मार्च वगळता या १० दिवसांत रुग्णसंख्याही ३०० पेक्षा खालीच स्थिर राहिली आहे. बाधितांचे प्रमाणही २५ टक्क्यांवर आले आहे.

दुसऱ्या लाटेत जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण समोर येत होते. शहरातील वाढती गर्दी, नियमांचे पालन न होणे अशा काही कारणांमुळे रुग्णसंख्येचा नवा उच्चांक नोंदविला जात होता. काही दिवस रुग्णसंख्या थेट ४५० पेक्षा अधिक नोंदविण्यात आली होती. कोविड केअर सेंटरवरील भारही मोठ्या प्रमाणात वाढला होता. पूर्ण क्षमतेने सेंटर सुरू करूनही रुग्णांना जागा मिळणे कठीण झाले होते. सक्रिय रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती. मात्र, गेल्या १० दिवसांची आकडेवारी बघितली असता, शहरातील रुग्णसंख्येचा आलेख घसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यात जळगाव शहरात सुरुवातीला तीन दिवसांचे कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर होळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे लोकांचा वावर थांबला हेाता. दरम्यान, विषाणूच्या प्रकृतीत सतत बदल होत असल्याने रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता दुसरीकडे वर्तविण्यात येत आहे.

मृत्यूचे प्रमाण मात्र गंभीर

बरे होणाऱ्यांची संख्या समाधानकारक असली तरी शहरातील मृत्यू रोखणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. कमी वयाच्या मृत्यूमुळे अधिकच भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्वाधिक मृत्यू जळगाव शहरातीलच नोंदविले जात आहेत.

दहा दिवसांतील स्थिती

२७२४ रुग्ण बरे झाले आहेत.

२४३२ रुग्ण आढळले

उपचार घेणारे रुग्ण २५४४

दिनांक, रुग्ण, बरे झालेले

२४- २४८, २३५

२५-२६४,४२८

२६-२५२,३२०

२७-४००,२२०

२८-१८४,३२०

२९-२८०,२३०

३०-१७१,१९०

३१-२८३,२५०

१ -१०१,३१९

२-२४९,४४२

Web Title: Comfort ... The graph of the number of patients in the city is declining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.