दिलासा... संपूर्ण आठवडा गेला शून्य मृत्यूचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:17+5:302021-07-03T04:12:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या आठवडाभरात एकाही मृत्यूची नोंद नसल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. यात गुरूवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात गेल्या आठवडाभरात एकाही मृत्यूची नोंद नसल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. यात गुरूवारी शहरात एकही रुग्ण नव्हता, मात्र, शुक्रवारी पुन्हा ३ बाधित आढळून आल्याने शून्याची ही साखळी तयार होण्याआधीच खंडित झाली आहे. दुसऱ्या लाटेत प्रथमच शहरात एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता.
शहरात सरासरी ३०० ते ३५० चाचण्या होत असून पॉझिटिव्हिटी ही आता एक टक्क्याच्याही खाली गेली आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण घटले आहे. शिवाय दिवसाला ७ ते ८ मृत्यूची मध्यंतरी नोंद होत होती. मात्र, यात गेल्या आठवडाभरापासून एकही मृत्यू नसल्याने मोठा दिलासा शहराला मिळाला आहे.
महिनाभरात तीन मृत्यू
पहिल्या व दुसऱ्या लाटेत जून महिन्यात शहरात जून महिन्यात मृत्यू थांबले. यात महिनाभरात तीन बाधितांच्या मृत्यूची नोंद असून एका महिनाभरातील ही दोनही लाटांमधील कमी संख्या आहे. शहरातील मृत्यूसंख्या ही सर्वाधिक ५७२ असून १ जून रोजी ही संख्या ५६९ नोंदविली गेली होती.
आठ तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शून्य
जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर, पारोळा, बोदवड या आठ तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एकही रुग्ण समोर आलेला नाही. यातील भडगाव तालुक्यात सर्वात कमी ७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकट्या चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक १११ रुग्ण उपचार घेत आहेत.
शहरातील कोरोनाची आठवडाभराची स्थिती
२५ जून -७
२६ जून- ४
२७ जून- ५
२८ जून -२
२९ जून ६
३० जून ५
१ जुलै ००
२ जुलै ०३