दिलासादायक... नव्या रुग्णांच्या तिपटीने कोरोना रुग्ण होताहेत बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:16 AM2021-05-15T04:16:16+5:302021-05-15T04:16:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात शुक्रवारी कोरोनाचे ६० रुग्ण आढळून आले तर १८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

Comfortable ... Corona is getting sick with a trio of new patients | दिलासादायक... नव्या रुग्णांच्या तिपटीने कोरोना रुग्ण होताहेत बरे

दिलासादायक... नव्या रुग्णांच्या तिपटीने कोरोना रुग्ण होताहेत बरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात शुक्रवारी कोरोनाचे ६० रुग्ण आढळून आले तर १८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, एकत्रित जिल्ह्यातील मृत्यूची संख्या घटली असून शुक्रवारी ९ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दहापेक्षा अधिकच मृत्यूची नोंद २४ तासात केली जात होती. दरम्यान, शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या घटून १२३३ वर आली आहे.

शुक्रवारी अन्य दिवसांच्या तुलनेत ॲन्टिजन चाचण्या या तिपटीने कमी झाल्या आहेत. २६४४ चाचण्यांमध्ये ४३२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर आरटीपीसीआरचे ३०६६ अहवाल समोर आले. यात २४९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. दुसरीकडे २४५४ अहवाल तपासणीला पाठविण्यात आले आहेत. मृतांमध्ये जळगाव शहरातील ६५ वर्षीय पुरूष व ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यासह भडगाव, भुसावळ तालुका प्रत्येकी २ जळगाव ग्रामीण, धरणगाव, बोदवड या तालुक्यात प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मृतांची संख्याही घटत असून आधी दिवसाला अगदी २४ पर्यंत मृत्यूची नाेंद केली जात होती. मात्र, ही संख्या आता १० पेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूही घटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आधी अगदी बारा मृत्यू दिवसाला व्हायचे हेच प्रमाण आता निम्यावर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गंभीर रुग्ण घटले

गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र कायम आहे. यात ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या आता १०३९ वर पोहोचली असून सद्यस्थिती ६४२ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे चित्र कायम असून गंभीर रुग्णांमध्ये नियमीत घट नोंदविली जात आहे. आता बहुतांश रुग्ण हे लक्षणेविरहीत असल्याचे समोर येत आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या २१२१ वर आली आहे. तर लक्षणे नसलेल्यांची संख्या ७५९५ वर पोहोचली आहे.

ग्रामीणमध्ये दुपटीचा दिलासा

जळगाव ग्रामीणमध्ये शुक्रवारी १६ बाधित आढळून आले असून ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुपटीने रुग्ण बरे झाले असून सक्रिय रुग्णांची संख्या घटून ३५३ वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीणमधील परिस्थितीही नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढली होती.

शहरातील रुग्ण १४० च्या खालीच

७ मे १२७

८ मे १३१

९ मे १०६

१० मे ६१

११ मे ६९

१२ मे ८६

१३ मे १२२

१४ मे ६०

आधीचा आठवडा वाढीचा

१ मे १५३

२ मे १४०

३ मे १७१

४ मे १५३

५ मे १६०

६ मे १३४

दहा तालुक्यात ५० पेक्षा कमी रुग्ण

अमळनेर :२०

पाचोरा : ४

भडगाव : ३

धरणगाव : २९

यावल : ३२

एरंडोल : ४४

जामनेर : १६

रावेर :४७

पारोळा : ३५

बोदवड : ३४

Web Title: Comfortable ... Corona is getting sick with a trio of new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.