आसोद्यात पॅनलपद्धतीची व्यूहरचना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:10+5:302020-12-27T04:12:10+5:30

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा येथे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीचा वेग वाढू लागला आहे. गुप्त बैठका निवडणुकीचे नियोजन प्रचाराची व्यूहरचना आखली ...

Comfortable panel system strategy started | आसोद्यात पॅनलपद्धतीची व्यूहरचना सुरू

आसोद्यात पॅनलपद्धतीची व्यूहरचना सुरू

Next

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा येथे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीचा वेग वाढू लागला आहे. गुप्त बैठका निवडणुकीचे नियोजन प्रचाराची व्यूहरचना आखली जात आहे. या ठिकाणी पॅनलपद्धतीने निवडणूक आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे पॅनलमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात नियोजन पूर्णत्वास आले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईचा सामना असोदेकर करीत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मूलभूत समस्यांसह पाणीटंचाईचा प्रमुख मुद्दा चांगलाच ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गावात एकूण सहा वॉर्ड असून, १७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सुमारे १२ हजारांच्या वर मतदारसंख्या आहे. आतापर्यंत या ठिकाणी पॅनलपद्धतीने निवडणूक लढविण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचार सुरुवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी मिळण्याकरिता ही प्रयत्न सुरू आहे. सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी गावाचा कारभार आपल्या हाती येण्याकरिता कंबर कसली आहे. माजी सरपंच विलास चौधरी, ग्रामपंचायत माजी सदस्य रवींद्र देशमुख, तर ग्रामीण विकास पॅनलचे प्रमुख तुषार महाजन निवडणुकीच्या आखाड्यात पॅनल उतरण्याकरिता हालचाली गतिमान केले आहे. पॅनलपद्धतीचे नियोजनाला सुरुवात केली आहे. पॅनलमध्ये आपल्याच उमेदवाराचा विजय कसा होईल याबाबतचे नियोजन व आखणी पॅनलप्रमुख करताना दिसत आहे.

पाणीटंचाईचा वनवास

आसोदेकरांना पाणीटंचाई नवीन नाही पाणीटंचाई ही आसोदेकरांना पाचवीलाच पुजलेली आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणी समस्या सोडविण्याबाबत आश्वासन मिळते, मात्र शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड ग्रामस्थांनी केली आहे. सन २०१२ पासून सुमारे पाच कोटी रुपयांची सुरू झालेली पाणी योजनाही सन २०२० मध्ये पूर्णत्वास आली. तरीही पाणी समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईचा वनवास संपणार कधी? पुन्हा तेच आश्वासन मिळतील का? याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे सध्या महिन्यातून एकदाच गावकऱ्यांना पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Comfortable panel system strategy started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.