वाणिज्य वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:39+5:302020-12-12T04:33:39+5:30

जळगाव : सोलीस यानमार या जापनीज तंत्रज्ञान असलेले अंजली ट्रॅक्टर या डिलरशिपचे उद्घाटन जळगाव शहरच्या महापौर भारती सोनवणे, ...

Commerce talks | वाणिज्य वार्ता

वाणिज्य वार्ता

Next

जळगाव : सोलीस यानमार या जापनीज तंत्रज्ञान असलेले अंजली ट्रॅक्टर या डिलरशिपचे उद्घाटन जळगाव शहरच्या महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, प्रा डी. डी. बच्छाव, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, मनपा नगरसेवक अंजली सोनवणे, ललित कोल्हे, मुकुंदा सोनवणे, भगत बालाणी, शरद तायडे, चंद्रशेखर इंगळे, जिल्हा परिषदचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे, लीलाताई सोनवणे, संचालक दिनेश सोनवणे, गणेश सोनवणे, सोलीस यानमार कंपनीचे एरिया मॅनेजर हेमंत शेलार, टेरिटरी मॅनेजर दत्तात्रय जगताप व परिसरातील शेतकरी बंधू उपस्थित होते. विशेष म्हणजे शुभारंभ दिनी सोलीस यानमार ट्रॅक्टरच्या चार वाहनांचे वितरण करण्यात आले, तरी सोलीस यानमार ट्रॅक्टरच्या सविस्तर माहितीसाठी अंजली ट्रॅक्टर सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्स, अजिंठा चौफुली, जळगाव येथे संपर्क साधावा.

सुपर स्पेशालिटी संधिवात क्लिनिक

जळगाव : शहरातील भास्कर मार्केटसमोरील अश्विनी मेडिको येथील संधिवात तज्ज्ञ डॉक्टर आस्था अग्रवाल (गनेरिवाल) एम.डी. मेडिसिन मुंबई , यांचे " संधिवात क्लिनिक" हे पूर्ववत सुरू झाले आहे. जळगावकरांच्या प्रामाणिक सेवेत गेल्या दोन वर्षांपासून असलेले एकमेव संधिवात क्लिनिक आहे. येथे ब्लड कलेक्शन, सिटीस्कॅन, एमआरआय, एक्स-रे या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ ते ७ दरम्यान तपासणी सुरू आहे. चेहऱ्यावर लाल रॅशेस, सांध्यांना सूज, संधिवात, पाठदुखी, कंबरदुखी, लहान मुलांमधील संधिवात, त्वचा लाल होणे, मांसपेशी दुखणे, युरिक ॲसिडचे प्रमाण वाढणे, प्रचंड थकवा जाणवणे, सकाळी उठल्यावर सांधे ताठरणे, वारंवार फ्रॅक्चर होणे, इत्यादी अनेकविध आजारांवर योग्य तपासणी करून उपचारपद्धती संधीवात क्लिनिकमध्ये केली जाते. वरील समस्या व आजारांसाठी रुग्णांनी प्रत्यक्ष भेटून लाभ घ्यावा.

वास्तुशास्त्र शिकण्याची संधी

जळगाव : सुप्रसिद्ध वास्तूऊर्जा तज्ज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. अविनाश कुलकर्णी यांच्या ''''वास्तू आरोग्यम''''तर्फे शनिवार, दि. १२ डिसेंबर २०२० पासून वास्तुशास्त्राच्या २१ तासांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होत आहे. भारतासह रशिया, अमेरिका, जर्मनी, सिंगापूर येथील विद्यार्थ्यांची परंपरा असलेल्या डॉ. अविनाश कुलकर्णी यांच्या वास्तुशास्त्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. वास्तू आरोग्यममध्ये नियोजित वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आयएओची मान्यता असलेले प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. या संधीचा लाभ घेऊन वास्तुशास्त्रात पारंगत व्हावे, असे आवाहन वास्तू आरोग्यमच्या सीईओ आकांक्षा निखिल कुलकर्णी यांनी केले आहे.

Web Title: Commerce talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.