जळगावात प्रभारी आयुक्तांना जमले, मग ते इतरांना का नाही?

By admin | Published: July 17, 2017 12:17 PM2017-07-17T12:17:45+5:302017-07-17T12:17:45+5:30

प्रभारी पदभार असलेला अधिकारी स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून शहरासाठी इतके काम करू शकतो.

The commissioner in charge of Jalgaon assembled, why do not they have others? | जळगावात प्रभारी आयुक्तांना जमले, मग ते इतरांना का नाही?

जळगावात प्रभारी आयुक्तांना जमले, मग ते इतरांना का नाही?

Next
लाईन लोकमत / सुशील देवकरजळगाव, दि. 17 - जिल्हाधिकारी पदासोबतच मनपा आयुक्तपदाचा प्रभारी पदभार सांभाळणा:या किशोर राजे निंबाळकर यांनी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत दररोज शहरातील सफाईची पाहणी करीत ठेकेदारांवर कारवाई केली. सफाईसाठी गोलाणी मार्केट चक्क चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्या धाकाने शहरात सफाईच्या कामांना गती आली. प्रभारी पदभार सांभाळून राजेंना जे जमले ते चार वर्ष पूर्णवेळ मनपाचेच काम करणा:या अधिकारी, नगरसेवकांना का जमले नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ मनपाची आर्थिक लूट करण्याचे कामच आतार्पयत केले गेल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हाधिकारी पदाचाच कामाचा प्रचंड ताण असताना व मनपा आयुक्त पदाचा प्रभारी पदभार असताना निंबाळकर यांना मनपाच्या तातडीच्या विषयांवर निर्णय घेऊन अलिप्त राहणे शक्य होते. मात्र प्रभारी पदभार असतानाही सफाईबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत त्यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून सकाळी 7 वाजेपासून स्वत: शहरात गल्ली-बोळात फिरून सफाईची पाहणी सुरू केली. कामचुकारपणा करणा:या सफाई ठेकेदारांवर कारवाई केली. काही ठेके रद्द केले. गोलाणी मार्केटमधील सफाईची पाहणी करून जिल्हादंडाधिकारी पदाचा अधिकार वापरत सफाईसाठी हे मार्केट चार दिवस बंद ठेवण्याचे खळबळजनक आदेशही दिले. प्रभारी पदभार असलेला अधिकारी स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून शहरासाठी इतके काम करू शकतो. तर गेल्या चार वर्षात पूर्णवेळ मनपाचे काम करण्याचा पगार घेणारे अधिकारी, तसेच मानधन घेणारे नगरसेवक यांना हे काम जमले नाही? आर्थिक परिस्थितीचा बाऊकोणताही अडचणीचा विषय पुढे आला की मनपातील अधिकारी, नगरसेवक सोयीस्करपणे मनपाच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा विषय पुढे करून वेळ मारून नेत आले आहेत. वसुली करण्यासाठी किंवा आहे त्या मनुष्यबळात सफाईचे, अतिक्रमणांवर कारवाईचे काम करण्यासाठी आर्थिकपरिस्थितीची अडचण कधीच नव्हती. मात्र जी कामे केवळ मक्तेदार, कर्मचा:यांना शिस्त लावून होण्यासारखी होती, त्यासाठी केवळ स्वत: रस्त्यावर उतरून लक्ष घालण्याची गरज होती, ती कामे देखील वर्षानुवर्ष केली गेली नाहीत. सफाईचे मक्ते तर नगरसेवकांनीच बचतगटांच्या, संस्थांच्या नावावर घेतले असल्याने व अधिका:यांचीही अळीमिळी गुपचिळी असल्याने चार वर्ष जळगावकरांची केवळ लूटच चालली होती. प्रभारी आयुक्तांनी पदभार घेतला तेव्हा मनपाचे कर्ज फिटलेले नाही. आर्थिक परिस्थिती तशीच बिकट आहे. आहे त्याच परिस्थितीत त्यांनी केवळ स्वत: लक्ष घालत मनपाच्या अधिकारी, कर्मचारी तसेच मक्तेदारांनाही शिस्त लावली. त्यामुळेच हे वेगळे चित्र बघायला मिळत आहे. मलिद्यासाठीच्या लाथाळ्या अंगाशीया सफाई ठेक्यांच्या मलिद्यावरून लाथाळ्या सुरू झाल्या. आरोप-प्रत्यारोप झाले. प्रभारी आयुक्त असलेल्या निंबाळकर यांना यातील अर्थकारण लक्षात आल्यानेच त्यांनी गांभीर्याने हा विषय घेत सफाईची पाहणी सुरू केली. विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवक, अधिकारी यांना सोबत घेऊनच पाहणी केली. आदल्या दिवशीच भेट देण्याच्या ठिकाणांचा दौराही जाहीर केला. तरीही सफाईबाबत निर्ढावलेल्या अधिकारी, मक्तेदारांनी गांभीर्य न दाखविल्याने कारवाईचे शस्त्र उगारले. त्यानंतर मात्र आरोग्य विभागाच नव्हे मनपाच्या सर्वच विभागांची झोप उडाली आहे. मनपाच्या इतिहासात प्रथमच गोलाणी मार्केट सफाईच्या कारणासाठी चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली. व्यापा:यांचीही जबाबदारीतत्कालीन नगरपालिकेने व्यापा:यांना व्यवसायासाठी एखाद्या मॉलसारख्या सुविधा असलेले गोलाणी मार्केट उपलब्ध करून दिले. तसेच अनेक वर्ष देखभाल दुरुस्तीही तत्कालीन नगरपालिकेने व नंतर मनपाने केली. मात्र येथील लिफ्टची सुविधा अथवा पार्क्ीगमध्ये होणारे अतिक्रमण, कच:याचे ढीग याकडे या मार्केटमध्ये व्यवसाय करणा:या व्यापा:यांनीही जागरूकपणे लक्ष ठेवण्याची गरज होती. नव्हे ती त्यांचीही जबाबदारी होती. मात्र केवळ सुविधांचा लाभ घ्यायचा, मग डोळ्यासमोर लिफ्टचे नुकसान होताना दिसले तरी कोणी बोलायचे नाही, असे प्रकार झाल्यानेच या मार्केटची रयाच गेली. आपण जेथे व्यवसाय करतो, तो परिसर साफ असला तर ग्राहकही आनंदाने येतील, असा विचारही करायला व्यापारी तयार नाहीत. प्रत्येक गोष्ट शासनाने अथवा महापालिकेनेच केली पाहिजे. आपली जबाबदारी नाही, या भावनेतूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हे बदलण्याच्या दृष्टीने आता एक पाऊल पुढे पडले आहे. मनपाचे पूर्णवेळ आयुक्त म्हणून काम केलेले संजय कापडणीस यांचा उद्देश केवळ मनपाच्या अडचणी वाढविणे हाच असल्याचा आरोप जाहीरपणे झाला. त्यांनी नगरसेवक, पदाधिका:यांना केवळ चॉकलेट देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात सफाईचा प्रश्न अधिक बिकट झाला होता. त्यानंतर आयुक्तपदी आलेल्या जीवन सोनवणे यांनी सेवानिवृत्ती वर्षभरावर असल्याने नगरसेवक, मक्तेदारांना न दुखावता, वेळ मारून नेण्याचे काम केले. त्याचा लाभ दुस:यांच्या नावाने मक्ते घेतलेल्या नगरसेवकांनी घेतला. अधिका:यांनीही या सफाई मक्तेदारांशी हातमिळविणी करीत जळगावकरांची केवळ लूटच केली हे स्पष्ट आहे.

Web Title: The commissioner in charge of Jalgaon assembled, why do not they have others?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.