भुसावळपेक्षा जळगाव गलिच्छ असल्याचे समितीचे ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:28 PM2017-07-21T12:28:44+5:302017-07-21T12:28:44+5:30
15 ऑगस्टपूर्वी जळगाव हगणदरी मुक्त झालेच पाहिजे अशी सक्त ताकीद
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 21 - भुसावळपेक्षा जळगाव शहर गलिच्छ आहे. 15 ऑगस्टपूर्वी जळगाव हगणदरी मुक्त झालेच पाहिजे अशी सक्त ताकीद राज्याच्या नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी मनपातील आरोग्य, बांधकामसह विविध विभागाच्या अधिका:यांना दिली. हगणदरीमुक्तीच्या कामकाजातील चालढकलबाबत त्यांनी या बैठकीत कडक शब्दात ताशेरे ओढले. स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. या मोहीमेंतर्गत सर्व शहरे 2 ऑक्टोबर र्पयत हगणदरी मुक्त करण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गठीत समिती महापालिकेत आली होती. गोपाळपुरा, तांबापूरा परिसरात दिल्या भेटीया समितीने सकाळी शहरातील गोपाळपुरा, तांबापूरा, असोदा रोड व पांजरापोळ टाकी परिसरातील उघडय़ावर शौचास बसण्याच्या ठिकाणांना भेटी दिल्या. तांबापुरा भागात नागरिकांच्या तक्रारीतांबापूरा भागात 30 नंबर वॉर्डात भेट दिली. तसेच नागरिकांशी चर्चा केली. या भागातील आरोग्य विभागाच्या कर्मचा:याकडे फोटो काढणे तसेच बांधकाम विभागाचीही जबाबदारी असल्याचे लक्षात आले.