संशोधन चौर्य प्रकरणात विद्यापीठाने स्थापन केली समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:19 AM2021-03-01T04:19:02+5:302021-03-01T04:19:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संशोधन चौर्य प्रकरणात इन्स्टिट्युशनल ॲकेडमिक इंटेग्रिटी पॅनेलचे (आयएआयपी) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संशोधन चौर्य प्रकरणात इन्स्टिट्युशनल ॲकेडमिक इंटेग्रिटी पॅनेलचे (आयएआयपी) गठन केले आहे. याबाबत अधिसभा सदस्य विष्णु भंगाळे व इतरांनी पाठपुरावा केला होता. विद्यापीठाने काही दिवस आधी ही समिती स्थापन केली.
प्र कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांचे संशोधन रिट्रॅक्टेड दिसत आहे. त्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. तसेच विद्यापीठात होत असलेल्या संशोधनावर देखील प्रश्न उपस्थित होत आहे. प्र कुलगुरू हेच विद्यापीठातील संशोधन विभागाचे प्रमुख असतात. त्यांच्यावर संशोधन चौर्याचा आरोप करण्यात आले आहे. त्यांचे संशोधन इंटरनेटवर रिट्रॅक्टेड असे दिसत आहे. तसेच गेल्या अडीच वर्षांपुर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने पत्र पाठवून विद्यापीठाला आयएआयपीचे गठन करण्यास सांगितले होते. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याबाबत विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य विष्णु भंगाळे, ॲड कुणाल पवार यासह अनेकांनी पाठपुरावा केला होता. त्यावर ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
आयएआयपी जरी गठीत करण्यात आलेली असली तरी कुलगुरु डॉ. पी.पी. पाटील यांनी दिलेला राजीनामा कालच राज्यपालांनी मंजुर केला आहे. त्यामुळे या समितीची पुढची कार्यवाही ही नवे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन हे करणार आहेत.