लेखापरिक्षणातील त्रृटींच्या पुर्ततेसाठी समितीची नियुक्ती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:05+5:302021-06-30T04:12:05+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३०५.१७ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी अधिसभा सभेत मान्यता देण्यात आली असली ...

A committee will be appointed to rectify the errors in the audit | लेखापरिक्षणातील त्रृटींच्या पुर्ततेसाठी समितीची नियुक्ती होणार

लेखापरिक्षणातील त्रृटींच्या पुर्ततेसाठी समितीची नियुक्ती होणार

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३०५.१७ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी अधिसभा सभेत मान्यता देण्यात आली असली तरी लेखापरिक्षण अहवालात त्रृटी असल्याचे सांगत सदस्यांनी त्यावर आक्षेप नोंदविला. परिणामी, सभेत अहवालाला मान्यता नाकारण्यात आली असून लेखापरिक्षण अहवालाच्या अनुषंगाने समिती नियुक्त करून आक्षेपांची पुर्तता करून अधिसभेसमोर हा अहवाल पुन्हा मांडला जाणार आहे.

विद्यापीठाची अधिसभा बैठक मंगळवारी प्रभारी कुलगुर प्रा़ ई़ वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाइन पध्दतीने पार पडली. यावेळी व्यासपीठावर बैठकीस प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरूवातीला व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली. या चर्चेत प्रा.गौतम कुवर, प्राचार्य आर.एस.पाटील, प्राचार्य ए.टी.पाटील, प्राचार्य लता मोरे, जी.वाय.पाटील, दिनेश नाईक, प्राचार्य अशोक राणे, प्राचार्य पी.पी.छाजेड, दिनेश खरात, प्राचार्य अशोक खैरनार, सुरेश पवार, प्राचार्य अनिल लोहार, डॉ.प्रशांत सरोदे, अमोल मराठे, डी.पी.नाथे, प्रा.एस.आर. चौधरी, नितीन ठाकूर, मनिषा खडके, प्रा.एकनाथ नेहेते, प्रा.सुनील गोसावी तसेच विष्णू भंगाळे यांनी भाग घेतला. प्रा.गौतम कुवर व विष्णू भंगाळे व नितीन ठाकूर यांनी काही सूचना या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने केल्या. सदस्यांच्या शकांचे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल यांनी निरसन केले. अनेक सदस्यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेश, विकासाभिमूख आणि विद्यार्थी केंद्रित असा असून कोरोनाच्या काळातही उभारी देणारा असल्याची भावना व्यक्त केली. चर्चेनंतर अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. त्यानंतर लेखापरिक्षण अहवाल सर्वांसमोर मांडण्यात आला़ पण, त्यात त्रुटी असून तो चर्चेशिवाय मंजूर करण्यात येवू नये अशी मागणी करण्यात आली़ या मागणीची दखल घेवून कुलगुरू यांनी समिती नियुक्त करून त्रुटींची पुर्तता करण्यात येईल, असे सांगितले.

कोरोना काळातील खर्च हा संशयास्पद

विद्यापीठाने कोरोना काळात केलेला खर्च हा संशयास्पद असून तो अधिक झालेला असल्याचा आरोप बैठकीत गौतम कुवर यांनी केला. प्रशासकीय तसेच गोपनीय खर्च सुध्दा ब-याच मोठ्या प्रमाणात झाल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी दरवर्षी तरतुद केली जाते, पण पुतळे बांधले जात नाही. तसेच कोरोना काळात वसतीगृहे बंद असताना, वसतीगृहांवर खर्च कसा झाला असाही सवाल त्यांनी उपस्थित केला़ संशोधन मंडळाच्या अद्याप एकही बैठक झालेली नाही. पण, ३६५ लाखांची तरतुद करण्यात आली असल्याचा मुद्दा एकनाथ नेहते यांनी उपस्थित केला. विद्यापीठाचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहीजे असेही सदस्यांनी सुचविले.

सदस्यांनी मिळविला सभागृहात प्रवेश

११ वाजता बैठक सुरू होणार असल्यामुळे काही सदस्यांनी विद्यापीठातील अधिसभा सभागृह गाठले़ मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत बसता येणार नाही, असे कुलगुरूंनी त्यांना सांगितले. दरम्यान, आपण परवानगी दिल्यानंतर नंतर ती नाकारत असल्याचे सांगत सदस्यांनी सांगितल्यानंतर काही वेळ गोंधळ झाला. त्यानंतर त्या सदस्यांसाठी एमसी हॉल येथे आॅनलाइन सभेची व्यवस्था करून देण्यात आली. मात्र, आवाज येत नसल्यामुळे या सदस्यांनी पुन्हा अधिसभा सभागृह गाठून तेथेच ठिय्या मांडला. दरम्यान, आॅनलाइन सभा असताना, इतर सदस्य सभागृहात कसा प्रवेश देण्यात आला सवाल उपस्थित करीत याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी नितीन ठाकूर यांनी बैठकीत केली.

प्रश्नोत्तरांचा तास तहकुब

सभेच्या सुरवातीला काही अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले. नंतर प्रश्नोत्तरांचा तास तहकुब करण्यात आला. सभेच्या शेवटी बोलतांना प्रभारी कुलगुरू प्रा.वायुनंदन यांनी या बैठकीत विकास विषयक चर्चा सदस्यांनी पोटतिडकीने केली या बद्दल आनंद व्यक्त केला.

यांचाही बैठकीत सहभाग

या सभेत बी.पी.पाटील, डॉ.अनिल चिकाटे, प्रा.पंकजकुमार नन्नवरे, डॉ.दिनेश पाटील, प्रा.मनिष जोशी, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य ए.पी.खैरनार, प्राचार्य ए.टी.पाटील, प्राचार्य नाना गायकवाड, प्राचार्य मिनाक्षी वायकोळे, प्राचार्य राजू फालक, अ‍ॅड.संदीप पाटील, प्रा.अनिल पाटील, प्रा. प्रकाश अहिरराव, प्रा.मोहन पावरा, प्रा.सुनील गोसावी, प्रा.किशोर कोल्हे, प्रा.संध्या सोनवणे, प्रा.भुषण चौधरी, प्रा.अजय सुरवाडे, प्रा.मधुलिका सोनवणे, अमोल सोनवणे, दिनेश खरात, नितिन ठाकूर, विवेक लोहार, मनिषा चौधरी, डॉ.प्रशांत सरोदे, प्रकाश पाठक, सुरेश पवार, राजेंद्र दहातोंडे, गिरीष पाटील, जी.वाय.पाटील, भुपेंद्र गुजराथी आदी उपस्थित होते.

Web Title: A committee will be appointed to rectify the errors in the audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.