आम आदमी विम्यापासून शेतकरी वंचित

By admin | Published: March 30, 2017 12:04 AM2017-03-30T00:04:41+5:302017-03-30T00:04:41+5:30

जामनेर तालुका : लाभ मिळण्यासाठी प्रचार आणि प्रसार होण्याची आवश्यकता

The common man deprives the farmer from insurance | आम आदमी विम्यापासून शेतकरी वंचित

आम आदमी विम्यापासून शेतकरी वंचित

Next

वाकोद, ता.जामनेर : ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक:यांसाठी 2007 पासून महाराष्ट्र शासनाने अपघात विमा म्हणून ‘आम आदमी विमा योजना’ सुरू केली. मात्र ही योजना गोरगरीब शेतक:यांर्पयत पोहोचली नसल्याने अद्यापही अनेक शेतकरी या विमा योजनेच्या माहितीपासून अनभिज्ञ असल्याने लाभापासून वंचित राहत                  आहेत.
शेतकरी शेतात रात्रंदिवस  काबाडकष्ट करतात. खरीप-रब्बी म्हणजेच संपूर्ण हंगामात शेतकरी हे आपल्या शेतात काम करतात. तसेच रात्रीच्या वेळी रखवाली करतात व पिकांना पाणी देताना शेतक:याला आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते.
 शेतातील कामे करत असताना छोटे-मोठे अपघात होत असतात. यामध्ये नैसर्गिक मृत्यू, हातपाय निकामी होणे, डोळा जाणे, सर्पदंश असे अनेक अपघात घडतात. त्यामुळे घरातील कत्र्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा अपघातानंतर शेतकरी कुटुंबाला हलाखीचा सामना करवा लागतो. त्यासाठी या योजनेची माहिती अल्पभूधारक शेतकरीवर्गाला व्हावी याकरिता तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे कामे सोपवून दिलेली आहे. परंतु या कर्मचा:यांनी आम आदमी विमा योजनेपासून होणारे फायदे याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती शेतकरीवर्गाला दिलेली नाही, असा आरोप करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी छोटे-मोठे अपघात होणा:या शेतक:यांना या आम आदमी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे                  लागते.
एवढी मिळते रक्कम
या योजनेंतर्गत कोणत्याच प्रकारचा मोबदला न घेता एक लाख रुपयांचा विमा काढला जातो. त्यामध्ये शेतक:याचा मृत्यू झाल्यास वारसाला 30 हजार रुपये, नैसर्गिक मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये, अपघातामध्ये डोळे निकामी झाल्यास 75 हजार रुपये अथवा डोळा गेल्यास व सर्पाने दंश केल्यास मदत दिली        जाते.
छोटे-मोठे अपघात झाल्यास त्या अपघाताची माहिती देणे या कर्मचा:यांना बंधनकारक आहे. मात्र असे होताना दिसत नाही. याकडे वरिष्ठ अधिकारिवर्गाने लक्ष देऊन या योजनेची माहिती शेतकरीवर्गार्पयत पोहोचवण्यासाठी या कर्मचा:यांना सूचना कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. 
जामनेर तालुक्यात आम आदमी विम्याचे 38 हजार 514 लाभार्थी आहेत. यापैकी अनेक लाभार्थ्ीचे बँक खाते असून, विमा कंपनीकडून अपघातग्रस्त (दावेदार) यांच्या खात्यावर मंजूर केलेली रक्कम परस्पर टाकली जाते किंवा त्यांच्या नावे धनादेश परस्पर घरी पाठवला जातो. याची कोणत्याही प्रकारची माहिती संबंधित कार्यालयाला दिली जात नाही. यामुळे स्थानिक पातळीवर अधिकारी-कर्मचा:यांना तोंड द्यावे लागत असल्याने अधिकारिवर्गदेखील मोठय़ा प्रमाणावर अडचणीत आलेला आहे.
38 हजार शेतक:यांची नोंदणी
 जामनेर तालुक्यात आम आदमी विमा योजनेचे 38 हजार 514 लाभार्थी आहेत. 2016-17 मध्ये मंजूर दावे संख्या 36 आहे. यापैकी 11 लाख 25 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच 1 एप्रिल 2016 पासून 30 डिसेंबर 2016 र्पयत 38 दावे प्राप्त झाले असून, नाशिक येथील विमा कंपनीकडून चार दावे मंजूर, तर 18 दावे तहसीलकडे पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत.
 ‘आम आदमी विमा’ ही शासन व भारतीय जीवन विमा निगम या दोघांची मिळून ही योजना भूमिहीन व अल्पभूधारक शेतक:यांसाठी सुरू केलेली योजना आहे. शासनाकडून देण्यात येणा:या अनेक दाव्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात त्रुटी काढून अनेक वेळी हे दावे प्रलंबित ठेवले जात असल्याने अडचणी निर्माण होतात. वेळोवेळी प्रकरणात किरकोळ त्रुटीमुळेदेखील लाभार्थ्ीना रक्कम तर मिळत नाहीच; परंतु जास्तीची वेळ मारून नेत असल्याच्या तक्रारी आहेत
आम आदमी विमा योजनेसंबंधी तलाठय़ासह इतरांना सूचना दिलेल्या असून, सर्वत्र जनजागृतीदेखील केलेली आहे. काही लाभार्थीची प्रकरणे संबंधित विमा कंपनीकडे पाठवली आहेत. लवकरच तलाठय़ांची सभा घेऊन जनजागृती करण्यात येईल.
-नामदेव टिळेकर,
तहसीलदार, जामनेर

Web Title: The common man deprives the farmer from insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.