जळगावात दरुगधीच्या शोधासाठी एक कंपनी पाच दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:36 PM2017-09-16T12:36:48+5:302017-09-16T12:37:11+5:30

दरुगधी कायम : अधिका:यांसह रहिवाशांनी परिसर काढला पिंजून

A company is closed for five days in search of Durga in Jalgaon | जळगावात दरुगधीच्या शोधासाठी एक कंपनी पाच दिवस बंद

जळगावात दरुगधीच्या शोधासाठी एक कंपनी पाच दिवस बंद

Next
ठळक मुद्दे 60 ते 70 महिलांनी औद्योगिक वसाहत परिसर पिंजून काढलामालकानेच पाच दिवस कंपनी बंद ठेवण्याची तयारी दर्शविली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16 - कालिंकामाता मंदिर परिसर, अयोध्यानगर, खेडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून येत असलेली उग्र दरुगधी शुक्रवारीही कायम असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या दुर्गंधीच्या शोधासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या व मनपाच्या अधिकारी, कर्मचा:यांसह परिसरातील 60 ते 70 महिलांनी औद्योगिक वसाहत परिसर पिंजून काढला. अखेर एका कंपनीजवळ परिसरातील दरुगधीसारखाच वास आल्याने या कंपनीत चौकशी केली असता मालकानेच पाच दिवस कंपनी बंद ठेवण्याची तयारी दर्शविली. मात्र नेमकी दरुगधी तेथूनच आहे की नाही याचा शोध घेतला जाणार असल्याचे अधिका:यांनी सांगितले. 
कालिंका माता मंदिर परिसरातील योगेश्वरनगर, तुळसाईनगर, अयोध्यानगर परिसरासह निमखेडी रोड परिसरातील खेडी परिसर, ज्ञानदेव नगर, योगेश्वर नगर या भागांमध्ये बुधवारी रात्री 11 वाजेपासून प्रचंड दरुगधी सुटली आह़े या बाबत समाजसेविका रुपाली वाघ यांनी  महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका:यांना फोनवरुन तक्रार केली होती. 
त्यानंतर शुक्रवारीही ही दुर्गंधी कायम असल्याने रुपाली वाघ यांनी मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी नितीन चौधरी यांना माहिती दिली. त्यानुसार चौधरी यांच्यासह मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील तसेच परिसरातील  60 ते 70 महिलांनी औद्योगिक वसाहत परिसर पिंजून काढला. अखेर महामार्गाच्या बाजूला एम सेक्टरमध्ये असलेल्या सनसाईन प्रा. लि. या कंपनीनजीक तशीच दरुगधी आल्याने तेथे चौकशी केली. 


नागरिकांच्या तक्रारीनंतर औद्योगिक वसाहत परिसरात पाहणी करण्यात आली. एका कंपनीजवळ तशीच दुर्गंधी आली असता चौकशी केली. त्या वेळी कंपनी मालकाने पाच दिवस कंपनीठेवण्याचीतयारी दर्शविली.
-नितीन चौधरी, क्षेत्रीय अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ.

Web Title: A company is closed for five days in search of Durga in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.