पीडितांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:56+5:302021-06-22T04:12:56+5:30
अतिवृष्टी असो वा दुसरे काही संकट, यामध्ये काही लोकांनी आपला जीवही गमावला आहे. अनेक घरांचे कर्ते लोक मृत्युमुखी ...
अतिवृष्टी असो वा दुसरे काही संकट, यामध्ये काही लोकांनी आपला जीवही गमावला आहे. अनेक घरांचे कर्ते लोक मृत्युमुखी पडले व अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अशा लोकांच्या वारसांना आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नुकसानभरपाई मिळत असते. तालुक्यातील निसर्गाने घाव घातलेल्या अनेक लोकांनाही नुकसान भरपाई रक्कम मिळाली. मात्र काही फक्त आणि फक्त अनुसूचित जातीतील पीडितांनाच ही नुकसानभरपाई शासनाच्यावतीने मिळालेली नाही, असे निदर्शनास आले आहे.
जी प्रकरणे प्रलंबित असतील, त्यांना लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे व संबंधित पीडितांना लवकरात लवकर मदत घ्यावी, अशी मागणी अमळनेर तालुक्यातील विविध संघटनांनी एकत्र येत केली. या संघटनांमध्ये समता समिती, भीम आर्मी व बहुजन रयत परिषद या संघटनांचा सहभाग होता.
निवेदनावर समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे, सचिव सुरेश कांबळे, लोकसंघर्ष मोर्चाचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे, भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष प्रवीण बैसाणे, शहर अध्यक्ष कृष्णकांत शिरसाठ, बाळासाहेब सोनवणे, राजू कांबळे, अविनाश पवार, उमाकांत बेहेरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
===Photopath===
210621\21jal_5_21062021_12.jpg
===Caption===
पीडितांना नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई द्या