ठिबक संच खराब निघाल्याने भरपाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:53 AM2019-01-19T01:53:42+5:302019-01-19T01:55:37+5:30

ठिबक संच खराब निघाल्याने जिल्हा ग्राहक मंचाने शेतकऱ्याला साडे सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश संबंधीत कंपनी आणि विक्रेत्याला दिला आहे.

 Compensation order due to drip set bad | ठिबक संच खराब निघाल्याने भरपाईचे आदेश

ठिबक संच खराब निघाल्याने भरपाईचे आदेश

Next
ठळक मुद्देअमळनेर तालुक्यातील कलाली येथील आहे शेतकरी.तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली होती लेखी तक्रार.

अमळनेर : तालुक्यातील कलाली येथील अ‍ॅड. पद्माकर दत्तात्रय पाटील व वसुंधरा पद्माकर पाटील यांनी घेतलेला ठिबक संच खराब निघाल्याने त्यांना कंपनी आणि विक्रेत्याने सुमारे साडे सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे.
अ‍ॅड. पद्माकर पाटील व वसुंधरा पाटील यांच्या कलाली येथील मालकीच्या शेतात पुणे येथील नेटाफेम इरिगेशन कंपनीचा ठिबक संच केळी खोड लावण्यासाठी माऊली इरिगेशन गडखांब यांच्याकडून १ लाख १८ हजार रुपये खर्चून ठिबक नळी, पाईप, कॉल, व इतर साहित्य खरेदी करून शेतात अंथरल्या होत्या. परंतु त्यांना त्या नळ्यामधून सुरुवातीला १० ते १५ ड्रिपमधून जास्त पाणी तर शेवटच्या ५ ते ७ ड्रिपला पाणी येत नसल्याचे निदर्शनास आले . संबंधित शेतकºयाने शेतात साडेचार हजार केळीचे खोड लावले होते त्यापैकी सुमारे ७० टक्के खोडाचे नुकसान झाले. सदर नुकसानीबाबत शेतकºयाने ३१ में २०१७ रोजी अमळनेर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्यावर नुकसानीचा पंचनामा केला असता संबंधित साहित्य हे सदोष आढळून ७० टक्के नुकसान झाल्याचे दिसून आले होते. यामुळे तक्रारदार पाटील व वसुंधरा पाटील यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती.
त्या तक्रारीवरुन गुणवत्तेच्या आधारावर नेटाफेम इरिगेशन पुणे व माउली इरिगेशन गड़खांब यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी ५ लाख ६० हजार रुपये व २० फेब्रूवारी २०१७ पासून शेकडा ६ टक्के प्रमाणे व्याज द्यावे आणि तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासापोटी २५ हजार रुपये द्यावे. तसेच तक्रारदारास अर्ज खर्च ५ हजार रुपये द्यावेत असा आदेश ७ जानेवारी २०१९ रोजी ग्राहक मंच जळगावचे अध्यक्ष उमेश जावळीकर व सदस्य सुरेश जाधव यांनी दिले आहेत. तक्रारदारातर्फे अ‍ॅड. राजेंद्र निकम व आर. बी. कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला.

 

Web Title:  Compensation order due to drip set bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.