निंबध स्पर्धा, प्रदर्शनाने छंद शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 09:16 PM2019-11-19T21:16:35+5:302019-11-19T21:16:57+5:30

जळगाव : शहरातील फिलेटली ग्रुप आणि कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छंद शिबीराचा रविवारी समारोप झाला. अंतिम ...

 Competition, exhibition concludes hobby camp | निंबध स्पर्धा, प्रदर्शनाने छंद शिबिराचा समारोप

निंबध स्पर्धा, प्रदर्शनाने छंद शिबिराचा समारोप

Next

जळगाव : शहरातील फिलेटली ग्रुप आणि कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छंद शिबीराचा रविवारी समारोप झाला. अंतिम दिवशी निबंध स्पर्धा आणि पोस्टाच्या तिकिटांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी या ठिकाणी भेट दिली़
रविवारी सकाळी विद्यालयात डाक कार्यालयातर्फे ह्यप्रिय बापूह्ण ही निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. यात १२० मुलांना अंतर्देशीय पत्र देण्यात आले होते. त्यावर त्यांनी निबंध लिहिला.
त्यानंतर पोस्टाच्या तिकिटांचे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी प्रा.डॉ. युवराज वाणी, प्रा. प्रकाश महाजन, राजेंद्र ठाकूर, प्रा.ललिता वाणी, साबीर शेख इमदाद, महेंद्र साखरे यांनी प्रदर्शनाची मांडणी केली.
सोनेरी तिकिटांची, रामायण, महाभारत मधील प्रसंगांची, प्रिन्सेस डायना, युनोमधील गांधीजींचे तिकीट, त्रिकोणी, गोल, काचेवरील, बाटलीच्या झाकणावरील, सीडीवरील तिकिटे, थ्रीडी तिकिटे, पेन्टच्या आकाराची अशी सुमारे ६० पेक्षा अधिक देशांची तिकिटे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.
जगभरात भारतीय व्यक्तीची म्हणून सर्वाधिक तिकिटे महात्मा गांधीजींची असल्याचे यावेळी प्रदर्शकांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक रवींद्र माळी यांनी मानले. निलेश नाईक, श्रीकांत पाटील, नरेंद्र वारके, राहुल धनगर, भूषण बºहाटे, उज्ज्वला जाधव आदींनी परिश्रम घेतले.

विद्यानिकेतनच्या ८०० विद्यार्थ्यांचे तिकिट
कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिरचे सुमारे ८०० विद्यार्थी स्वत:चे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट काढणार असून त्यासाठी डाक विभागाकडे नोंदणी करण्यात येत आहे. राज्यात नव्हे तर देशातील स्वत:चे छायाचित्र असणारे तिकीट काढणारे कमल वाणी पहिलेच विद्यालय ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रगती शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. युवराज वाणी यांनी दिली.

Web Title:  Competition, exhibition concludes hobby camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.