भुसावळ येथे लोकसंख्या शिक्षणावर स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 04:38 PM2018-09-12T16:38:50+5:302018-09-12T16:39:35+5:30

Competition on population education at Bhusawal | भुसावळ येथे लोकसंख्या शिक्षणावर स्पर्धा

भुसावळ येथे लोकसंख्या शिक्षणावर स्पर्धा

Next
ठळक मुद्देलोकनृत्य स्पर्धेत द. शि. विद्यालय तर भूमिका अभिनय स्पर्धेत नवोदय विद्यालय प्रथमजळगाव जिल्ह्यातील दोन्ही गटातील संघांचा समावेशस्पर्धेस प्रेक्षकांचाही प्रतिसाद

भुसावळ, जि.जळगाव : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व व्यावसायिक विकास संस्थेतर्फे लोकसंख्या शिक्षणविषयक लोकनृत्य स्पर्धा व भूमिका अभिनय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यातील लोकनृत्य स्पर्धेत द. शि. विद्यालय, तर भूमिका अभिनय स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत लोकनृत्य स्पर्धा व भूमिका अभिनय स्पर्धा जवाहर नवोदय विद्यालयात घेण्यात आली. लोकनृत्य स्पर्धेसाठी लिंग समभाव व समानता, स्त्रीभ्रूणहत्या, ज्येष्ठांची देखभाल व आदर, पर्यावरण संरक्षण, किशोरवयीन मुलामुलींचे मानसिक व शारीरिक बदल, एड्स : एक कलंक आणि कुमारांची जबाबदारी, कुमारावस्थेतील मुलांमधील निकोप मैत्री, कुमारांपुढील पुढील आकर्षणे आणि आव्हाने, लोकसंख्या शिक्षण, स्वच्छता व आरोग्य या विषयांवर घेण्यात आली.
भूमिका अभिनय स्पर्धा कुमारावस्थेतील मुलांमधील निकोप मैत्री, कुमारांपुढील आकर्षणे आणि आव्हाने, एड्स : एक कलंक आणि कुमारांची जबाबदारी, व्यसनाधिनता : कारणे आणि परिणाम या विषयांवर घेण्यात आली. जिल्हाभरातील सात संघांचा स्पर्धेतील दोन्ही गटात सहभाग होता.
स्पर्धेचे समन्वयक म्हणून डीआयईसीपीडीचे अधिव्याख्याता प्रा.शैलेश पाटील होते. नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. खंडारे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, उपप्राचार्य कोसे यांच्या उपस्थितीत स्पर्धांना प्रारंभ झाला. परीक्षक म्हणून कांचन शैलेश राणे व प्रदीप श्रावण पाटील यांनी काम पाहिले. लोकनृत्य स्पर्धेत भुसावळ येथील द.शि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघात स्वाती नरवाडे, हर्षा तायडे, ममता दाभाडे, जान्हवी बोदवडे, अश्विनी नरवाडे, काजल वानखेडे, संजना बौरासी, साक्षी साळवे, सोनाली तायडे, कोमल सोनार यांचा समावेश होता. त्यांना मुख्याध्यापक जे. बी. राणे, मोहनदास सपकाळे, प्रियंका तायडे यांनी मार्गदर्शन केले. द्वितीय क्रमांक जळगाव येथील रामलाल चौबे महानगरपालिका विद्यालय यांनी तर तृतीय क्रमांक जवाहर नवोदय विद्यालयाच्या संघाने पटकावला.
भूमिका अभिनय स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या संघाने तर तृतीय क्रमांक भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलने पटकावला. विजेत्या सहाही संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धा यशस्वीतेसाठी डीआयईसीपीडीचे प्राचार्य डॉक्टर गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर मोरे, भुसावळ गटसाधन केंद्रातील संजय गायकवाड, नवीद खाटीक, यशवंत धायगुडे यांनी परिश्रम घेतले.





 

Web Title: Competition on population education at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.