स्पर्धा परीक्षा, करिअरवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 08:23 PM2020-06-02T20:23:04+5:302020-06-02T20:23:17+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय बंद आहेत़ या काळात विद्यार्थ्यांची गुणपत्ता वाढावी म्हणून एसएसबीटी महाविद्यालयातर्फे आॅनलाईन संवाद उपक्रम राबविला ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय बंद आहेत़ या काळात विद्यार्थ्यांची गुणपत्ता वाढावी म्हणून एसएसबीटी महाविद्यालयातर्फे आॅनलाईन संवाद उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून देशभरातील तज्ज्ञांकडून एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करियर, नोकरी, उच्चशिक्षण, पाईव्ह जी टेक्नॉलॉजी, मोबाईल सॉफ्टवेअर, स्टार्टअप आर्दी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
आतापर्यंत आनंद पांडे, राहुल टेनी, अनंत वावरे,कवीश्वर कळंबे, हर्षल बोरसे, राजेश पाटील, श्रेयस देशपांडे, अनिरुद्ध परमार, पूनीत शर्मा, अक्षय नारखेडे, संचित पाटील , अमेय शिरवाडकर , स्वरूप पाटील, पूजा शर्मा, डॉ. मानव भटनागर , पुजा शर्मा, गौरव चौधरी आदी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे़ यावेळी विद्यार्थ्यांना फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले जात आहे.