तक्रारदारांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:16 AM2021-03-05T04:16:29+5:302021-03-05T04:16:29+5:30
या प्रकरणाची तक्रार करणारे जननायक फांउडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी व सहकाऱ्यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन ...
या प्रकरणाची तक्रार करणारे जननायक फांउडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी व सहकाऱ्यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम कथन केला. तरुणीने जी तक्रार केली त्याविषयी देखील त्यांनी माहिती दिली. बुधवारी गुप्तचर यंत्रणा, सीआयडीनेही तसेच चौकशी समितीकडेही जबाब नोंदविले. जबाबाची प्रत देण्यास मात्र समितीने नकार दिल्याची माहिती पिंजारी यांनी दिली.
चौकशी समिती पोहचली गावात
वसतीगृहात ज्या मुलीला नृत्य करायला लावले ती मुलगी यावल तालुक्यातील असल्याचे उघड झाल्यानंतर रात्री साडे आठ वाजता चौकशी समिती थेट या गावात पोहचली. तेथे संबंधित मुलगी, तिचे आई, वडील यांचे जबाब नोंदविण्यात आले. परंतु याबाबत अत्यंत गोपनियता पाळली जात होती. चौकशी समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे, महिला उपनिरीक्षक कांचन काळे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कांचन चव्हाण व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे आदींचे पथक गावात गेले होते.
गर्भवती मुलींना हलविले
ज्या दिवशी हा गोंधळ झाला, त्याच दिवशी सायंकाळी तक्रारदार महिलेने गर्भवती मुलींना मारहाण केल्याचा दावा वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनीच केला व त्यानंतर या मुलींना निरीक्षणगृहात हलविण्यात आल्याचेही वसतीगृहाच्या परिविक्षाधिन महिला अधिकारी रंजना झोपे यांनी सांगितले होते.