जोंधनखेडा येथे विहीर अधिग्रहणाचा बनाव : रक्कम लाटल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 09:59 PM2019-07-24T21:59:04+5:302019-07-24T22:02:25+5:30

मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा गावाला पाणीटंचाई निवारणार्थ हिवरे शिवारातील विहीर अधिग्रहीत करून जोंधनखेडा गावाला पाणीपुरवठा केल्याचा खोटा बनाव करून अधिग्रहणाच्या मोबदला सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून लाटल्याची तक्रार आहे

Complaint about the fake acquisition of a well at Jondhankheda | जोंधनखेडा येथे विहीर अधिग्रहणाचा बनाव : रक्कम लाटल्याची तक्रार

जोंधनखेडा येथे विहीर अधिग्रहणाचा बनाव : रक्कम लाटल्याची तक्रार

Next
ठळक मुद्देचालू हातपंप दाबला पेव्हर ब्लॉकमध्येजोंधनखेडा विहीर अधिग्रहणाबाबत आलेली तक्रार गंभीर

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील जोंधनखेडा गावाला पाणीटंचाई निवारणार्थ हिवरे शिवारातील विहीर अधिग्रहीत करून जोंधनखेडा गावाला पाणीपुरवठा केल्याचा खोटा बनाव करून अधिग्रहणाच्या मोबदला सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून लाटल्याची तक्रार उपसरपंचासह दोन ग्रा.पं. सदस्यांनी तहसीलदार व पंचायत समिती सभापतींकडे केली आहे, तर दुसरीकडे जोंधनखेडा गावात रस्ता कॉंक्रिटीकरण विकास कामात एक मात्र सुरू असलेली विंधन विहीरदेखील बुजून टाकल्याचा धक्कादायक प्रकारची तक्रारही करण्यात आली आहे.
जोंधनखेडा गावातील पाणीटंचाई निवारणार्थ हिवरे शिवारातील पुखराबाई दरबार तडवी यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीला सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून कागदपत्रांचा खेळ केला व प्रस्ताव तयार करून विहीर अधिग्रहीत केली. या विहिरीवरून जोंधनखेडा गावाला कोणतीही पाईपलाईन नसताना किंवा वाहन व टँकरची व्यवस्था नसताना सरपंच व ग्रामसेवक यांनी जून २०१९ मध्ये जमीनधारक मूळ मालकाऐवजी मूळ मालकाचा मुलगा फरीदाबाद तडवी यांच्या नावाने ३६ हजार रुपये निधी शासनाकडून विहिर अधिग्रहण करण्याच्या मोबदल्यात मिळवले. फरीद तडवी यास केवळ एक हजार रुपये देत उर्वरित ३५ हजाराची रक्कम सरपंच व ग्रामसेवक दोघांनी लाटली, अशी तक्रार पंचायत समिती सभापती शुभांगी बोलाने व तहसीलदार श्याम वाडकर यांच्याकडे करण्यात आली आहे
चालू हातपंप दाबला पेव्हर ब्लॉकमध्ये
दरम्यान, गावात शाळेजवळील एक मात्र जिवंत विंधन विहीर (हातपंप) देखील रस्ता कॉंक्रिटीकरण व पेवर ब्लॉक विकास कामात दाबून टाकली आहे. यामुळे गावकऱ्यांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी व गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडण्यात यावा, अशी मागणी तक्रारीत केली आहे.
तक्रार अर्जावर जोंधनखेडा गावाचे उपसरपंच मैनाबाई गुलाब तडवी, ग्रामपंचायत सदस्य रेहाना रईस तडवी व जावेद पीरखा तडवी यांच्या स्वाक्षरी आहेत.

टंचाईबाबत विहीर अधिग्रहण मोबदला ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांच्याकडील अहवालाशिवाय दिला जात नाही. जोंधनखेडा विहीर अधिग्रहणाबाबत आलेली तक्रार गंभीर आहे. याबाबत तातडीने चौकशी करण्यात येईल.
- शुभांगी चंद्रकांत भोलाने, सभापती, पंचायत समिती, मुक्ताईनगर


 

Web Title: Complaint about the fake acquisition of a well at Jondhankheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.