शिरसमणी येथे पतीची पत्नीसह तीन जणांविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:46+5:302021-06-24T04:13:46+5:30
याबाबत सतीश पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली की, दिनांक २३ मे २०१९ रोजी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मौजे शिरसमणी येथे ...
याबाबत सतीश पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली की, दिनांक २३ मे २०१९ रोजी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मौजे शिरसमणी येथे आपला विवाह झाला. आम्ही एकत्र गुण्यागोविंदाने राहत होतो. मात्र दिनांक १२ सप्टेंबर २०२० रोजी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या दोघात भांडण निर्माण झाली.
पत्नीने अनेक कारणावरून माझ्याशी आकांडतांडव केला व शिवीगाळ करून शिरसमणी येथे असली दोन बखळ प्लॉट व वडिलोपार्जित शेती माझ्या नावे करून दे, अशी मागणी आरोपी पत्नी अर्चना पाटील हिने केली. तसेच शुभम पाटील, अनिल पाटील व कल्पना पाटील यांनी अश्लील शिवीगाळ करून फिर्यादीस व वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून १२ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगल पोत, ६ ग्रॅम सोन्याची अंगठी असे दागिने हिसकावून घेतले. यामुळे आरोपींविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस करीत आहेत.