घंटागाड्या येत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:41+5:302021-09-25T04:16:41+5:30

जळगाव : जिल्हा बँकेसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांची अंतीम मतदार यादी शनिवारी प्रसिध्द होणार आहे. याआधीच्या यादीत जे ठराव ...

Complaint that bells are not ringing | घंटागाड्या येत नसल्याची तक्रार

घंटागाड्या येत नसल्याची तक्रार

Next

जळगाव : जिल्हा बँकेसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांची अंतीम मतदार यादी शनिवारी प्रसिध्द होणार आहे. याआधीच्या यादीत जे ठराव करण्यात आले होते. त्यात अनेक सभासदांचा मृत्यू झाला होता. यांचे नाव काढून नवीन ठराव करण्यासोबतच नव्याने मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

घंटागाड्या येत नसल्याची तक्रार

जळगाव : शहरातील स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले असून, शहरातील अनेक भागात घंटागाड्या येत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांलगत देखील मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. मनपाकडून कचरा संकलनाचे काम देखील थांबले असल्याबाबत मनपा प्रशासनाकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे.

अतिक्रमण फोफावले

जळगाव - शहरातील मुख्य रस्त्यांलगत गेल्या काही दिवसांपासून हातगाड्या चालकांसह फळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. विशेष म्हणजे शहरातील ख्वॉजामिया चौक व गणेश कॉलनी चौक परिसरात सायंकाळी वाहने चालविण्यास देखील जागा शिल्लक राहत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Complaint that bells are not ringing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.