आरटीओंनी खोटे गुन्हे दाखल केल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:15 AM2021-02-12T04:15:51+5:302021-02-12T04:15:51+5:30
मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ जळगाव : मुलगी झाली म्हणून तसेच माहेरुन दोन लाख रुपये आणावेत यासाठी श्रध्दा महेंद्र पाटील ...
मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ
जळगाव : मुलगी झाली म्हणून तसेच माहेरुन दोन लाख रुपये आणावेत यासाठी श्रध्दा महेंद्र पाटील (२०,रा.मन्यारखेडा) या विवाहितेचा सासरच्यांनी मानसिक व शारिरीक छळ केला म्हणून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती महेंद्र भिमसिंग पाटील, सासरे भिमसिंग दाजिबा पाटील, सासू सखबाई, नणंद जनाबाई जितेंद्र पाटील, दिर राजेंद्र पाटील, दिरानी शितल राजेंद्र पाटील (सर्व रा.मन्यारखेडा, ता.जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. तपास हवालदार अनिल फेगडे करीत आहेत.
गोलाणी मार्केट परिसरातून सायकल चोरी
जळगाव : गोलाणी मार्केट परिसरातून हार्दीक भरत तुरखीया या तरुणाची दोन हजार रुपये किंमतीची सायकल ७ फेब्रुवारी रोजी चोरी झाली आहे. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास प्रफुल्ल धांडे करीत आहेत.
उपोषणाचा इशारा
जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज करुनही प्रफुल्ल बोरकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला नाही, तसेच ८ फेब्रुवारीचे उपोषणही मागे घेतले, तरी देखील न्याय मिळाला नाही त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा संजय सुधाकर उबाळे (रा.कंडारी, ता.भुसावळ) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिलेला आहे.
अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला
जळगाव : सिंधी कॉलनी परिसरात ९ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता ६५ वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आलेला आहे. संबंधित व्यक्तीच्या उजव्या हाताच्या कामेवर राम नाव व श्रीकृष्णाचे चित्र गोंदलेले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे करीत आहेत.