पोलीस निरीक्षक धनवडे यांंना भोवली तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 09:56 PM2020-10-31T21:56:49+5:302020-10-31T21:57:01+5:30

अल्पवयीन मुलीचे प्रकरण

Complaint lodged with Inspector Dhanwade | पोलीस निरीक्षक धनवडे यांंना भोवली तक्रार

पोलीस निरीक्षक धनवडे यांंना भोवली तक्रार

Next
वल : येथील पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांची दहा महिन्यातच जळगाव मुख्यालयातील मानव संसाधन विभागात बदली झाली आहे. गेल्या सहा वर्षात कार्यकाळ पुर्ण होण्याच्या आतच बदली होणारे धनवडे हे येथील सातवे अधिकारी आहेत. राजोरा येथील पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस बालसुधारगृहात रवानगी न करता संशयितासोबत रवाना केल्याचे प्रकरण धनवडे यांना भोवले असल्याची तालुक्यात चर्चा आहे. मात्र गेल्या महीन्यात राजोरा येथील अल्पवयीन मुलीस संशयीतांनी पळवून नेल्यानंतर संशयीत मुलीसह पोलीस ठाण्यात हजर झाला असता मुलीची रवानगी बालसुधारगृहात न करता तिला संशयितांच्या हवाली केल्याचा आरोप मुलीच्या मातापित्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तसेच आमदार शिरीष चौधरी यांचेकडे केल्यावरून धनवडे यांची अप्पर पोलीस अधिक्षक गवळी यांनी चौकशी करत फैजपुर उपविभागीय पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पिंगळे यांचेकडे तपास सोपवला. नेमके हेच प्रकरण धनवडे यांच्या अंगलट आल्याची चर्चा असून त्यांच्या बदलीमागे हेच कारण असल्याचे शहरात बोलले जात आहे. पदभार सपोनि वानखडे यांच्याकडेफैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रकाश वानखडे यांनी येथील पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून शनिवारी पदभार स्विकारला आहे.

Web Title: Complaint lodged with Inspector Dhanwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.