शिक्षक पतपेढीत भरतीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:06+5:302021-06-09T04:21:06+5:30
भुसावळ : शहरातील नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीत नियमबाह्य भरती करण्यात आल्याची तक्रार पतसंस्थेच्या तिघा संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली ...
भुसावळ : शहरातील नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीत नियमबाह्य भरती करण्यात आल्याची तक्रार पतसंस्थेच्या तिघा संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली असून या प्रकाराची चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
तक्रारीचा आशय असा की, येथील नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढी येथील लिपिक पवन पाटील यांचा कोरोनाने २४ एप्रिलला मृत्यू झाल्यानंतर या लिपिकाची जागा अंध-अपंग अनुशेषअंतर्गत भरण्यात आली होती. मात्र, लिपिकाच्या मृत्यूला एक महिनाही उलटत नाही. तसेच मयत लिपिकाचा मृत्यू दाखला नसताना व कर्ज खाते बंद न करता तोच अवघ्या एक महिन्यात वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता अनुशेषानुसार भरती प्रक्रिया न राबवता पद भरण्यात आल्याचा आरोप संचालक प्रदीप सोनवणे, नीलेश पाटील व कैलास तायडे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केला आहे.