मनपा पदाधिकाऱ्यांच्या वाहनाबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:40+5:302020-12-15T04:32:40+5:30

जळगाव : मनपा पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर नंबरप्लेटवर लावण्यात आलेल्या सभापती नावाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी जिल्हाधिकारी व आरटीओकडे ...

Complaint regarding vehicle of Corporation office bearers | मनपा पदाधिकाऱ्यांच्या वाहनाबाबत तक्रार

मनपा पदाधिकाऱ्यांच्या वाहनाबाबत तक्रार

Next

जळगाव : मनपा पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर नंबरप्लेटवर लावण्यात आलेल्या सभापती नावाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी जिल्हाधिकारी व आरटीओकडे तक्रार केली आहे. एम.एच. १९ ए.४३१ व एम.एच.१९ ए.४३३ या वाहनावर महाराष्ट्र शासन, सभापती, मनपा, जळगाव अशी प्लेट लावण्यात आलेली आहे. ही वाहने महाराष्ट्र शासनाची, मनपाची की सभापतींची याचा बोध होत नाही. शासकीय वाहनावर पदाधिकाऱ्याचे पद व नाव लिखित नसते, तरी देखील त्याचा उल्लेख करण्यात आला आहे, असे नाटेकर यांचे म्हणणे आहे.

खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनिल मोतीराम सोनवणे यांच्याविरुध्द खोटा गुन्हा (क्र.१२०७/२०२०) दाखल केल्याची तक्रार माजी नगरसेविका लीला रमेश सोनवणे यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. पती रमेश तोताराम सोनवणे यांचा ६ एप्रिल २००८ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खून झालेला आहे. यात पुतण्या अनिल सोनवणे हा फिर्यादी आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्यातूनच आमच्याविरुध्द खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात, म्हणून वेळोवेळी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज केलेले आहेत.

Web Title: Complaint regarding vehicle of Corporation office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.