आयुक्त, उपायुक्तांविरोधात फिर्याद!

By admin | Published: January 18, 2016 12:31 AM2016-01-18T00:31:35+5:302016-01-18T00:31:35+5:30

महापालिका : मोबाइल टॉवरप्रकरणी उपमहापौरांची पोलिसात फिर्याद, चौकशीअंती होणार कारवाई

Complaints against Commissioner, Deputy Commissioner! | आयुक्त, उपायुक्तांविरोधात फिर्याद!

आयुक्त, उपायुक्तांविरोधात फिर्याद!

Next

धुळे : महापालिकेचे उपमहापौर फारूख शहा यांच्यासह नगरसेवकांनी रविवारी आयुक्त डॉ़ नामदेव भोसले व उपायुक्त डॉ़ प्रदीप पठारे यांच्याविरुद्ध शहर पोलिसात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ मोबाइल टॉवरप्रकरणी नियमबाह्य कारवाई केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला़ दरम्यान चौकशीअंती योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितल़े

मनपाच्या बुधवारी झालेल्या महासभेत उपायुक्त डॉ़ प्रदीप पठारे यांच्या कार्यमुक्तीचा ठराव करण्यात आला़ तेव्हापासून पुन्हा एकदा प्रशासन व नगरसेवकांमध्ये संघर्ष सुरू झाला आह़े शहरातील 36 अनधिकृत मोबाइल टॉवरला नियम डावलून नाहरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी उपायुक्तांच्या कार्यमुक्तीचा ठराव करण्याबरोबरच त्यांना सभागृहातून काढून देण्यात आले होत़े

त्यानंतर उपमहापौर फारूख शहा व सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर जयश्री अहिरराव यांची भेट घेऊन उपायुक्त डॉ़ पठारे यांच्या वेतनासह सर्व अन्य भत्ते व सुविधाही थांबविण्याची मागणी केली होती़ त्यानुसार महापौरांनी प्रभारी आयुक्त प्रकाश वायचळ यांना पत्र दिले आह़े त्यानंतरही आयुक्त व उपायुक्त यांच्याविरोधात निर्माण झालेला रोष कमी झालेला नसल्याचे रविवारी दिसून आल़े उपमहापौर फारूख शहा यांनी नगरसेवक नरेंद्र परदेशी, कुमार डियालाणी, साबिर मोतेबर यांनी अॅड़ पी़डी़पाटील यांच्यासह पोलीस मुख्यालय गाठल़े अनधिकृत मोबाइल टॉवरबाबत माहिती अधिकारात मागविण्यात आलेली संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी हिंमत जाधव यांच्याकडे आयुक्त व उपायुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ त्यानंतर सर्व नगरसेवकांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन आयुक्त व उपायुक्तांविरोधात फिर्याद दिली़ त्यांनी पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांच्याशी चर्चा करीत महासभेने केलेल्या ठरावाची माहिती दिली़ पोलिसांनी चौकशीअंती कारवाईचे आश्वासन दिल़े

 

मनपा उपमहापौर व नगरसेवकांनी आयुक्त व उपायुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आह़े मात्र मागणी करताच गुन्हा दाखल होऊ शकत नाही़ याबाबत आलेल्या निवेदनातील बाबींची चौकशी करून जर फौजदारी कारवाई करण्यासारखी माहिती समोर आली तर त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल़

-हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे

Web Title: Complaints against Commissioner, Deputy Commissioner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.