मनपाच्या ‘स्मार्ट अ‍ॅप’वर तक्रारींचा पाऊस

By admin | Published: May 24, 2017 12:30 AM2017-05-24T00:30:29+5:302017-05-24T00:30:29+5:30

३ दिवसात १५८ तक्रारी : ४९८ जणांनी केले अ‍ॅप डाऊनलोड

Complaints of Municipal Corporation's 'Smart App' | मनपाच्या ‘स्मार्ट अ‍ॅप’वर तक्रारींचा पाऊस

मनपाच्या ‘स्मार्ट अ‍ॅप’वर तक्रारींचा पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या समस्यांसाठी ‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’ व ‘कॉल सेंटर’ सुरू करण्यात आले असून ही सुविधा सुरू झाल्यापासून अवघ्या तीन दिवसांत विविध विभागांशी संबंधित तब्बल १५८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. तसेच मनपाने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांना विविध विभागांबाबत तक्रारींसाठी खास तयार केलेले ‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’ अवघ्या तीन दिवसात तब्बल ४९८ नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतले आहे.
महानगरपालिकेकडून नागरिकांच्या समस्यांसाठी ‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’ व ‘कॉल सेंटर’ सुरू करण्यात आले असून या सेवेचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते  २० मे रोजी करण्यात आला.  मोबाईलच्या                एका क्लिकवर तक्रारी करता येणार असल्याने सोय झाली  आहे़ कॉल सेंटरच्या ७९०००५१००० या क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना बांधकाम परवानगीसाठी काय करावे, जन्म दाखल्यांसाठी  काय करावे        लागते, 
विवाह नोंदणी अशा विविध                            प्रश्नांची माहिती नागरिकांना मिळणार आहे. तसेच सेवा व सुविधांबाबतदेखील काही तक्रारी अ                 सल्यास या कॉल सेंटरवर करता येणार आहेत.
मनपाच्या ९० प्रकारच्या तक्रारींसाठी हा नंबर वापरता येणार आहे. तर ‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’ हे गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येणार आहे.                   त्याद्वारेही नागरिकांना विविध विभागांशी संबंधित           तक्रारी नोंदविता येणार आहे. तसेच विविध परवानग्या, मंजुºया आदीबाबतची माहिती मिळणार आहे.

कॉल सेंटरवरील तक्रार होते रेकॉर्ड
कॉलसेंटरवरील ७९०००५१००० या क्रमांकावर तक्रार केली असता त्याची तेथील कर्मचाºयांकडून नोंद करून संबंधित विभागाकडे तक्रार पाठविली जातेच. त्यासोबत हा फोन कॉल रेकॉर्डही होतो. त्यामुळे कॉलसेंटरवरील कर्मचाºयांकडून तत्परतेने दखल घेऊन संबंधित विभागाकडे तक्रार पाठविली जात आहेच. शिवाय अधिकाºयांकडूनही तातडीने दखल घेतली जात आहे.

अस्वच्छतेच्या तक्रारी जादा
तीन दिवसांत नागरिकांकडून १५८ तक्रारी कॉलसेंटर व ‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’द्वारे दाखल झाल्या. त्यात सर्वाधिक ८९ तक्रारी आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. तर पाणीपुरवठा विभागाशी संबंधित २२, बांधकाम-२०, विद्युत विभाग- १६, अतिक्रमण विभाग- ५, नगररचना विभाग- ३, मलेरिया विभाग- १, पर्यावरण विभाग -२ अशा तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Web Title: Complaints of Municipal Corporation's 'Smart App'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.