चौपदरीकरणाच्या कराराचा १ टप्पा पूर्ण
By Admin | Published: April 4, 2017 11:38 PM2017-04-04T23:38:50+5:302017-04-04T23:38:50+5:30
फागणे ते तरसोद मार्गाच्या करारावर स्वाक्षरी : दुसरा करार आठवडाभरात होण्याची शक्यता
जळगाव : चौपदरीकरणाच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या कराराची प्रक्रिया एका मक्तेदाराने पूर्ण केली असून करारावर नुकत्याच स्वाक्षºया झाल्या. फागणे ते तरसोद या मार्गावरील चौपदरीकरणाबाबत ही प्रक्रिया झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या सात वर्षापासून रखडले आहे. नवापूर ते अमरावती या सुमारे ४८४ किलोमीटरच्या कामासाठी सुरुवातीच्या काळात एल अॅण्ड टी कंपनीस काम देण्यात आले होते मात्र येत गेलेल्या अडचणींमुळे या कंपनीने काम न करण्याचा निर्णय शासनाला दिला. नंतर या कामाचे तीन टप्पे करण्यात आले. पैकी दोन टप्प्याचे काम या आधीच सुरू झाले असून फागणे ते चिखली या कामासाठीच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या टप्प्याचे फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. या कामाची निविदाही मंजूर झाल्या असून गेल्या नोव्हेंबरमध्ये संबंधित कंपनीस काम स्वीकृतीचे पत्रही देण्यात आले आहे. त्यामुळे आता कंपन्यांशी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडून करार होणे ही प्रक्रिया बाकी होती.
कामाचे वाटपाचे नियोजन
फागणे ते तरसोद या ८७.३ किलो मीटरचे काम एमबीएल कण्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीला तर तरसोद ते चिखली या ६२.७ कि.मी. टप्प्याचे काम विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे. या कंपन्यांकडून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण कामकाजाबाबत करार करून घेणे अपेक्षित होते.
एका करारावर स्वाक्षरी
दोन पैकी फागणे ते तरसोद या ८७.३ किलो मीटरचे काम करणाºया एमबीएल कन्स्ट्रक्शन प्रा. लि. व अॅग्रॉ ज्वार्इंट व्हेंचर असलेल्या कंपनीच्या अधिकाºयांनी दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत जाऊन महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांशी चर्चा करून महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या एका टप्प्याच्या कामाच्या करारावर स्वाक्षरी केली.
दुसरा करार
तरसोद ते चिखली या टप्प्याचे काम करणाºया विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरकडून आठवडाभरात करारावर स्वाक्षरी केली जाणार असल्याचे राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले.
आर्थिक नियोजनाची तयारी
करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर संबंधित कंपन्या कामासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक बाबींच्या बळकटीकरणासाठी हा करार बॅँकांमध्ये सादर करून कर्जाची उभारणी करतील. त्यानंतर ही उपलब्धता झाल्यानंतर राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडून या कंपन्यांना काम सुरू करण्याबाबचे कार्यादेश दिले जातील असे सूत्रांनी सांगितले.
महामार्गाच्या डागडुजीसाठी कार्यादेशाची प्रतीक्षा
महामार्गावरील डागडुजीच्या कामासाठी कुंजीर, अग्रवाल कस्ट्रक्शन व विश्वराज एन्व्हायरमेंट या कंपन्यांची निविदा पात्र ठरली आहे. आता या कंपन्यांच्या आर्थिक क्षमतांची चाचपणी बुधवारी केली जाणार आहे. या आठवड्यात या कामाचे कार्यादेश निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.