दीड वर्षात सर्व प्रकल्प पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 05:26 PM2018-01-28T17:26:32+5:302018-01-28T17:52:43+5:30
गिरीश महाजन: ग. स. च्या सत्कार समारंभात दिली ग्वाही
जळगाव- वीज व पाण्यामुळे शेतक:यांचे जगणे सुसह्य होत असल्याने शेतक:यांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी जळगाव जिल्ह्यातील रखडलेले सर्वच प्रकल्प दीड वर्षात मार्गी लावू, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. रविवारी दुपारी रिंगरोडवरील यशोदया सभागृहात ग. स. सोसायटीच्या सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सहकार गटाचे अध्यक्ष बी. बी. पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार किशोर पाटील, आमदार उन्मेश पाटील, महापौर ललित कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांच्यासह एस. एस. पाटील, झांबर पाटील, उत्तमराव पाटील, विठ्ठल पाटील, डी. सी. पाटील, ह. का. बोरोले, आर. एच. बाविस्कर, राजेश पवार, सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर, उपाध्यक्ष कैलासनाथ चव्हाण, विद्यादेवी पाटील, अनिल पाटील, तुकाराम बोरोले आदी संचालकांची मुख्य उपस्थिती होती. समारंभात ज्येष्ठ सभासद, ठेवीदार, वर्गणीदार, सभासदांचे गुणवंत पाल्य, शिक्षक आदींचा सत्कार करण्यात आला. केंद्र शासनाकडून 39 हजार कोटींचा निधी यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, राज्याच्या जलसंपदा विभागाच्या नियोजनाचा देशात पहिला क्रमांक आला असून केंद्राने या विभागाला 39 हजार कोटींचा निधी दिला आहे. यातून जिलतील सर्व प्रकल्प मार्गी लावले जात असल्याचे ते म्हणाले. शेतक:यांना वीज आणि पाणी व्यवस्थित दिले तर त्यांना कर्जाची व कजर्माफीची गरज पडणार नाही. मात्र गेल्या 15 वर्षात आधीच्या सत्ताधा:यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. तर मतदार आज हुशार झाला आहे. त्यामुळे पुढा:यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. मी बिबटय़ाच्या मागे धावलो अन्.. चुकून काही बोललं की अंगाशी येते. मी बिबटय़ाच्या मागे चांगल्या हेतूने पिस्तूल घेवून धावलो होतो मात्र त्याच्याही वेगळ्या अर्थाने बातम्या रंगल्या असे गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. ग. स. सोसायटीच्या कार्याचा आवजरून गौरवही त्यांनी केला.
पुढा:यांनी पतसंस्था काढू नयेत-गिरीश महाजन
गिरीश महाजन म्हणाले, मी महालक्ष्मी पतसंस्था सुरु केली होती. परंतु 1993 पासून ज्या कार्यकत्र्यानी कर्ज घेतले त्यांनी ते अजून भरले नाही. कार्यकर्ते असल्याने बोलता येत नाही, म्हणूच संस्था बंद पडली. तेव्हा पुढा:यांनी पतसंस्था काढू नये कारण कर्ज दिले नाही तरी राग आणि कर्ज दिले आणि हप्ते मागितले तरी राग.
ठेवीदारांचे पैसे हडप करणा:यांना सोडणार नाही- गुलाबराव पाटील
जिल्ह्यात अनेक पतसंस्थांनी ठेवीदारांचे पैसे हडप केले. अशा ठेवीदारांना मी सोडणार नाही. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पतसंस्थाची खाती ओपन करुन ठेवीदारांना न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
पुढारी बुडविणारे ..
पुढारी आणि पोलिसांना कुणीच कर्ज देत नाही. त्यातल्या त्यात पुढारी बुडविणारे म्हणून ओळखले जात असल्याने त्यांना कर्ज मिळत नाही, असे सांगत असताना जवळच्या नातेवाईकांना , ओळखीच्यांना कर्ज देण्याच्या धोरणामुळे अनेक पतसंस्था बुडाल्या. काही पतसंस्था केवळ अफवांमुळे बुडाल्या. रात्रीतून मोठय़ा रांगा ठेवी काढायला लागल्यानेही नुकसान झाल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
महाजन यांचे केले कौतुक
गुलाबराव पाटील यांनी यावेळी गिरीश महाजन यांचे आरोग्य विषयक कामांचे कौतुक केले. तसेच जलसंपदा खात्याच्या कामाचाही चांगला उल्लेख करताना आसोदा परिसरात पाईपलाईनने शेतार्पयत पाणी आणण्यच्या योजनेचे श्रेयही महाजन यांनाच दिले.प्रास्ताविक विलास नेरकर यांनी केले तर सूत्रसंचालन अजबसिंग पाटील यांनी केले.
पक्षा शिवाय विचार करु शकत नाही !
मी पक्षाशी एकनिष्ठ असून आज काय मिळाले किंवा नाही मिळाले तरी मी पक्षाशिवाय दुसरा विचार करु शकत नाही, असे प्रतिपादन गिरीश महाजन यांनी येथे केले. काही विषय नसताना त्यांचे हे विधान म्हणजे पक्षावर नाराजी व्यक्त करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ‘तो’ टोला होता. अशी चर्चा यावेळी रंगली.