अमळनेरच्या हॉटस्पॉट झोनमध्ये पूर्णत: संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 03:43 PM2020-04-26T15:43:25+5:302020-04-26T15:43:31+5:30

अत्यावश्यक वस्तू घरपोच : मयत संशयितांच्या नातेवाईकांना केले क्वारंटाईन

Complete curfew in Amalner's hotspot zone | अमळनेरच्या हॉटस्पॉट झोनमध्ये पूर्णत: संचारबंदी

अमळनेरच्या हॉटस्पॉट झोनमध्ये पूर्णत: संचारबंदी

Next


अमळनेर : शहरात कोरोणचे रुग्ण वाढत चालल्याने त्याचा प्रसार थांबवण्यासाठी आरोग्य विभागाने कठोर पावले उचलली असून मयत संशयित रुग्णांचा अहवाल आला नसला तरी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असून अक्षयतृतीयाच्या दिवशी देखील हॉटस्पॉट झोन मध्ये सर्व्हे करण्यात आला. दरम्यान या झोनमध्यजे पूर्णत: संचारबंदी करण्यात आली आहे. तर २६ रोजी सकाळी नव्याने कोणताही अहवाल न आल्याने शहरार नागरिकांनी सुखाने अक्षयतृतीयचा आनंद घेतला.
शहरातील तांबेपुरा , सानेनगर व अमलेश्वर नगर भागातील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यांना प्रथमदर्शनी कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने व श्वास घेण्यास , खोकल्याचा व तापाचा त्रास होत होता म्हणून संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी रवाना केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र अहवाल बाकी असला तरी शक्यता गृहीत धरून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रताप हॉस्टेल आणि आंबेडकर वसतिगृहात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यामुळे संभाव्य संसगार्चा धोका कमी होणार आहे
मृत रुग्णांच्या संपर्कातील १९ लोकांचे नमुने घेतले
दरम्यान साळीवाड्यातील कोरोना पॉझिटिव्ह मृत महिलेच्या संपर्कातील अजून ७ जण व शाह आलम नगर भागातील कोरोना पॉझिटिव्ह मृत इसमाच्या संपर्कातील १२ जणांना स्वॅब घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. आतापर्यंत रुग्णांच्या संपर्कातील ४० जणांना तपासणी साठी रवाना करण्यात आले आहे
मठगव्हान येथील एका व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आणि तो एका डॉक्टरच्या संपर्कात होता म्हणून त्याला तपासणी साठी रवाना करण्यात आले. तर शनिवारी पाठवलेल्या तीन व्यक्तींपैकी एकाला परत पाठवण्यात आले आहे. कोरोना पोझीटिव्ह मयत आणि संशयित मयत रुग्णांच्या गल्ल्या बॅरॅकेट्स लावून सील करण्यात आल्या आहेत आरोग्य सेविका, आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविकांमार्फत दररोज सर्व्हे सुरू आहे. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुखायधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी नागरिकाना घराबाहेर येण्यास मनाई केली असून त्यांना दूध , किराणा , भाजीपाला घरपोच देण्याची तयारी दर्शवली आहे. किराणा दुकांदारांचे नंबर्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
प्रांताधिकारी सीमा आहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी विलास महाजन , पोलीस निरीक्षक अंबादास मोरे सतर्क असून उपाययोजना व नियोजन करीत आहेत
 

Web Title: Complete curfew in Amalner's hotspot zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.