ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास पूर्ण करा- राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:35+5:302021-09-25T04:16:35+5:30
जळगाव : पीडितांना जलदगतीने न्याय देण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करावा, अशा ...
जळगाव : पीडितांना जलदगतीने न्याय देण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या. शुक्रवारी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या कायद्यांतर्गत १२ गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी या बैठकीत दिली.
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी जुलैअखेर अनुसूचित जातीची ७ तर अनुसूचित जमातीची ६ असे एकूण १३ गुन्हे पोलीस तपासावर होते. त्यापैकी सात गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला तर उर्वरित सहा आणि ऑगस्टमध्ये नव्याने दाखल झालेल्या सहा गुन्हे असे एकूण १२ गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे सांगितले. ऑगस्टमध्ये ११ पीडितांना १५ लाख ४३ हजार ७५० रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.