शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन वेळेत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 06:54 PM2020-11-28T18:54:08+5:302020-11-28T18:54:20+5:30

डायट प्राचार्य अनिल झोपे यांचे आवाहन : शाळासिद्धी निर्धारकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

Complete school achievement self-assessment on time | शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन वेळेत पूर्ण करा

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन वेळेत पूर्ण करा

Next

जळगाव - शाळासिद्धी राष्ट्रीय मूल्यांकनाच्या कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी बाकी राहिलेल्या शाळांनी लवकरात लवकर स्वयंमूल्यमापनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन डायट प्राचार्य अनिल झोपे यांनी केले.

जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट आणि जिल्हा परिषदतर्फे शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियंत्रण अधिकारी डॉ. राजेंद्र महाजन, डीएड् प्राचार्य डॉ. सुवर्णा चौधरी, शाळासिद्धी निर्धारक प्रमोद आठवले, प्राथमिक स्तर जिल्हा संपर्क अधिकारी अनिता परमार, माध्यमिक स्तर जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्यासह निर्धारकांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र महाजन यांनी गेल्या वर्षीच्या स्वयंमूल्यमापनाचा आढावा घेतला. राजश्री सपकाळे व मनोज चिंचोरे यांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील शाळासिद्धी स्वयंमूल्यमापनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या शाळासिद्धी निर्धारकांचा डायट व जिल्हा परिषद यांच्यातर्फे प्राचार्य अनिल झोपे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन श्यामकांत रूले यांनी तर आभार सुनील वानखेडे यांनी मानले.

शाळासिद्धी निर्धारकांचा सन्मान
यावेळी कार्यक्रमात शाळासिध्दी निर्धारकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा नियंत्रक अधिकारी डॉ. राजेंद्र महाजन, प्राथमिक स्तर जिल्हा संपर्क अधिकारी अनिता परमार, माध्यमिक स्तर जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्यासह निर्धारक श्यामकांत रूले, प्रमोद आठवले, मनोज चिंचोरे, डॉ. अर्चना विसावे, प्रणिता झांबरे, भानुदास जोगी, नितीन भालेराव, सुरेखा पाटील, संजय राजपूत, विलास तायडे, राजश्री सपकाळे, विनोद धनगर, विजय मंगलानी, रोशनकुमार साळुंखे, अश्विनी कोळी, रत्ना बागुल, दीपक पाटील, दंगल पाटील, नवनाथ पवार, दीपक पाटील, रामराव मुरकुटे, मीरा जंगले, सुनील वानखेडे, शांताराम तायडे, रामेश्वर भदाणे, कल्पना देवरे, महिंद्र नेमाडे, सागर भोसले, बापू बारी, सुधीर पाटील, भारती चौधरी, शशिकांत राणे राजपूत, गुलाम दस्तगीर खान यांना डायट प्राचार्य अनिल झोपे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

 

Web Title: Complete school achievement self-assessment on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.