पारोळा शहर बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 08:18 PM2019-08-05T20:18:55+5:302019-08-05T20:19:29+5:30
पारोळा : शहरातील नागरिकांना अवाजवी बिल दिल्याप्रकरणी महावितरणकडे अनेक वेळा लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी तक्रारी दिल्या. त्यानंतर महावितरण अधिका-यांनी वीजमीटर बदलून ...
पारोळा : शहरातील नागरिकांना अवाजवी बिल दिल्याप्रकरणी महावितरणकडे अनेक वेळा लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी तक्रारी दिल्या. त्यानंतर महावितरण अधिका-यांनी वीजमीटर बदलून देण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप ते पूर्ण न केल्याने संतप्त नागरिकांनी शहरात बंद पाळला. त्यास सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळाला.
महिनाभरापूर्वी महावितरणने ग्राहकांना अवाजवी वीज बिले दिल्याप्रकरणी नगरसेवकांसह नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या आधिका-यांना निवेदन दिले होते.त्या वेळी संबंधित अधिका-याकडून नागरिकांना नवीन मीटर बसवून देण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही मीटर न बसविल्याने वीज ग्राहक संतप्त झाले आहेत. याविरोधात शहरभर नागरिकांनी ५ आॅगस्ट रोजी बंद पुकारला. त्यास सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळाला.
नगरसेवक पी.जी.पाटील यांनी वीज वितरण कंपनीला वेळोवेळी निवेदन देऊन मीटर बदलण्याची मागणी केली. वरिष्ठ अधिका?्यांनी आश्वासन देऊन त्या आश्?वासनांची पूर्ती केली नाही. त्याविरोधात अखेर पारोळा शहर बंद करण्याचे आवाहन केले. त्याला पारोळा शहरातील छोटे-मोठे व्यापारी, भाजीपाला मार्केट, धान्य मार्केट, सोन्या-चांदीचे व्यापारी, कापड दुकानदार, किराणा व्यापारी, हॉटेलचालक सर्वांनी दुकाने बंद ठेवून महावितरण कंपनीचा निषेध केला.
नगरसेवक पी.जी.पाटील यांनी केलेल्या आवाहनाला व्यापा?्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यापुढे महावितरण कंपनीने वीज मीटर बदलले नाही तर वीज ग्राहक बिल भरणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी शहरभर वीज वितरण कंपनीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ईश्वर ठाकूर, विजय पाटील, मनीष अग्रवाल, सुहास राजपूत, समाधान धनगर, गणेश देशमुख, प्रताप पाटील, कृष्णा शिंपी व कामगार संघटनेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.