सातबारा संगणकीकरण 90 टक्के पूर्ण
By admin | Published: May 9, 2017 12:55 AM2017-05-09T00:55:54+5:302017-05-09T00:55:54+5:30
कामांना गती : अचूकतेसाठी तीन टप्प्यात चावडी वाचन
जळगाव : सातबारा शेतक:यांना ऑनलाईन उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हाप्रशासनातर्फे वेगाने कामे सुरू आहेत़ यात अद्यापपावेतो संगणकीकरण व ई-फेरफार ची 90 टक्के काम पूर्ण झाले आह़े सातबा:यामध्ये अचूक नोंदी व्हाव्यात यासाठी तीन टप्प्यांमध्ये चावडी वाचन मोहिम राबविण्यात येणार असून अचुकतेवर शिक्कामोर्तब झाल्यावर खातेदारांना बसल्या जागी ऑनलाईन पध्दतीने सातबारा मिळणार आह़े
जिल्ह्यात एकूण 11 लाख 57 हजार 694 सव्र्हे क्रमांक आहेत. त्यापैकी 2 लाख 74 हजार 361 सव्र्हे क्रमांकावरील काम यापूर्वीच प्रमाणित करण्यात आले आहे. तर 7 लाख 77 हजार 112 सव्र्हे क्रमांक एडीट मार्क करण्यात आले आहे. एडीट मार्क करण्यात आलेल्या सव्र्हे क्रमांकापैकी 7 लाख 64 हजार 411 सव्र्हे क्रमांकही प्रमाणित करण्यात आले आहे. याप्रमाणे एकूण सव्र्हे क्रमांकापैकी 10 लाख 38 हजार 772 सव्र्हे क्रमांकांचे काम एडिट मोडय़ुलमध्ये पूर्ण झाले असून आतार्पयत जिल्ह्यात ऑनलाईन सातबारा एडीट मोडय़ुलचे 90 टक्के काम पूर्ण झाले आह़े
24 मुद्दय़ांची करणार तपासणी
याप्रमाणे 24 मुद्यांची तपासणी चावडी मोहिमेत करण्यात येणार असून मोहिमेचे काम गुणवत्तापूर्वक करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिका:यांना दिले आह़े सातबारा संगणकीकरणाचे काम 90 टक्के पूर्ण झालेले असले तरी वारस नोंद, बँकांचे बोजे बसविणे व हटविणे, इकरार बोजे हटविणे यासंबंधीच्या अनेक शेतक:यांच्या नोंदी प्रलंबित आहेत. शेतकरी त्यासाठी तहसील कार्यालयात वणवण फिरतात. जळगाव तालुक्यात ही समस्या अधिक आहे.
तीन टप्प्यात चावडी वाचन मोहीम
ई प्रणाली व ई चावडी प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बिनचूक सातबा:यासाठी तीन टप्प्यात चावडी वाचन मोहीम राबविण्यात येत आह़े यात 1 मे 15 मे या काळात खातेदारांनी सातबा:याची संकेतस्थळावरून खातरजमा करणे, 16 मे ते 15 जून यात दरम्यान दुस:या टप्प्यात ऑनलाईन पूर्ण झालेल्या सातबा:यातील चुका दुरुस्त करून चावडी वाचनातून खातेदारांचे आक्षेपांची नोंद घेणे तसेच 16 जून ते 15 जुलै तिस:या टप्प्यात चावडी वाचनानंतर तपासणीअंती डिजिटल स्वाक्षरीने सातबारा वितरणासाठी योग्य मानला जाणार आह़े