जळगावात राबविली जातेय ‘ग्रंथ घर’ संकल्पना

By रवींद्र.माधव.मोराणकर | Published: November 26, 2017 06:35 PM2017-11-26T18:35:54+5:302017-11-26T18:42:01+5:30

सर्वासाठी खुले : वाचन-लेखन करणा:यांसाठी मिळतात पुस्तके

The concept of 'Granth Ghar' is being implemented in Jalgaon | जळगावात राबविली जातेय ‘ग्रंथ घर’ संकल्पना

जळगावात राबविली जातेय ‘ग्रंथ घर’ संकल्पना

googlenewsNext

रवींद्र मोराणकर । ऑनलाईन  लोकमत

जळगाव, दि.26 : सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयांमध्ये आपल्याला हवी ती पुस्तके मिळतात. प्रत्येक वाचनालयाचा आवाका आपापल्या ऐपतीप्रमाणे असतो. मात्र जळगाव येथील शिक्षणतज्ज्ञ तथा केसीई सोसायटीचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी आपल्याकडील ग्रंथालय हे वाचक आणि ग्रंथप्रेमींसाठी खुले करून दिले आहे. ‘ग्रंथ घर’ ही संकल्पना ते प्रत्यक्षात अमलात आणत आहेत. याचा आतार्पयत अनेक वाचकांनी, ग्रंथप्रेमींनी लाभही घेतला आहे. जळगावातील महाबळ कॉलनी परिसरातील आपल्या घराला त्यांनी एखाद्या ग्रंथालयाचेच स्वरूप दिले आहे. घराच्या तिन्ही खोल्या, आतील व शेवटच्या घरातील माळोच्यावरही त्यांनी पुस्तके ठेवलेली आहेत. मराठी साहित्यातील सर्व विषयांवरची आणि वा्मयाच्या सर्व प्रकारातील हजारो पुस्तके असल्याचे ते अभिमानाचे सांगतात. आजच्या स्थितीत त्यांच्याकडे किमान सात लाख रुपये किमतीची पुस्तकं आहेत. वाचन-लेखनाची आवड असलेल्यांनी यावं, त्यांच्यासाठी सदैव आपले ‘ग्रंथ घर’ उपलब्ध आहे. यासाठी कोणतेही शुल्क नाही. मात्र एकच अट. ग्रंथ नीटनेटके हाताळावेत, वाचून झाल्यावर ते परत करावेत. पुस्तकं घराघरात पोहचावीत वाचन संस्कृती वाढावी म्हणून नव्हे तर घराघरात पुस्तकं पोहचावीत, ती वाचली जावीत, हा प्रमुख उद्देश असल्याचं ते सांगतात. मुलगा हर्षवर्धन याच्या लग्नात सर्वाना चार पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला. असे 80 संच दिले. आतार्पयत किमान दीड लाख रुपये किमतीची पुस्तकं भेट म्हणून दिली असल्याचे ते नमूद करतात. शाळांना, शिक्षकांना, विद्याथ्र्याना व पालकांना विनामूल्य पुस्तकं भेट देत असतात. फक्त वाचनाचे प्रकार बदलले मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडियामुळे वाचन कमी झाले नसून, फक्त वाचनाचे प्रकार बदलले आहेत. अलीकडे इंटरनेटवरही खूप पुस्तकं वाचली जाताहेत. मुलं ग्रंथ घर बघायला येतात, चर्चा करतात, पण शिक्षकांना तसं वाटत नाही, अशी खंतही चंद्रकांत भंडारी यांना वाटते. लिहित्या हातांना पुरवतो विषय पीएच.डी. करणा:यांना नेहमीच मदत करतो. लिहित्या हातांना वेगवेगळे विषय पुरवतो, असे 15-20 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. गरजू विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ग्रंथालयांना आम्ही (मी व पत्नी) पुस्तकं भेट देतो. जेणेकरून त्यांनाही विविध विषयांची पुस्तकं कळतात, चर्चा होते. विद्याथ्र्याना अभ्यास करताना प्रकल्पांसाठी या ग्रंथांचा उपयोग होतो, असे ते सांगतात. 60 वर्षीय भंडारी गेल्या 36 वर्षापासून ‘ग्रंथ घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबवत आहेत. त्यांची आतार्पयत 18 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात बालवा्मय, समीक्षा, कादंबरी, पालक प्रबोधनपर पुस्तिकांचाही समावेश आहे. पुस्तकांची गोष्टीरूप ओळख करावी ‘श्यामची आई’ यशोदाबाईंचे यंदा स्मृती शताब्दी वर्ष आहे. यानिमित्त जळगावच्या गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील शाळेत गोष्टीरूप कथा ते सांगतात. या शैक्षणिक वर्षाचा वर्षभराचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. लहान मुलांर्पयत पुस्तकं पोहोचवायचे, पण त्याआधी पुस्तकांची गोष्टीरूप ओळख करून दिली पाहिजे, गोष्ट म्हटली की, मुलं शांतपणे ऐकतात, यासाठी मुलांना अभ्यासाकडे वळते करण्यासाठी गोष्टी रूपाने त्यांना वळविता येऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.

Web Title: The concept of 'Granth Ghar' is being implemented in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.