जळगावच्या शासकीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर मांडणार महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ाची संकल्पना
By admin | Published: April 27, 2017 12:01 PM2017-04-27T12:01:35+5:302017-04-27T12:01:35+5:30
जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 14 विद्यार्थी फडणवीस यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडतील.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 27 - मुंबईत 1 मे रोजी ‘ट्रान्सफार्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमाव्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 10 हजार विद्याथ्र्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा सादर करणार आहेत़ या कार्यक्रमात जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 14 विद्यार्थी फडणवीस यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडतील.
2025 मधील महाराष्ट्राच्या विकासाचे दर्शन घडविणा:या कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त शहरांमधून सुमारे 10 हजार विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर स्टॉलच्या माध्यमातून विकासासाठीच्या सजर्नशील व अभिनव संकल्पना मांडणार आहेत़
वरळी येथे एनएससीआय स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आह़े विकासाच्या ह्या नवीन संकल्पनेला राज्यातील प्रत्येक गावांमध्ये नेण्यासाठी सुध्दा या युवकांचा सहभाग असेल़
या 14 विद्याथ्र्याचा समावेश
राज्यव्यापी कार्यक्रम ट्रान्सफार्म महाराष्ट्रमध्ये राज्यातील विकासातील विविध सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक आव्हानांवर मात करण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालयांना आमंत्रित करण्यात आले आह़े यात जळगावच्या शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालयाचे नवीनकुमार पटेल, हर्षल चौधरी, जुनैद शेख, अश्विनी आदमाने, तुषार वसाके, किरण तायवाडे, सृष्टी सावलकर, श्वेता धाके, देवयानी अव्सेकर, अंकिता पोजगे, अशोक लाडे, सुमेध ङोंडे, प्रियांका गुरनुले व सुरल पौल हे 14 विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर सादरीकरण करणार आहेत़ या विद्याथ्र्याच्या माध्यमातून जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आह़े