विज्ञानाच्या संकल्पना केवळ अभ्यासक्रमात नको

By admin | Published: February 6, 2017 12:26 AM2017-02-06T00:26:23+5:302017-02-06T00:26:23+5:30

माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील : विज्ञान साहित्य संमेलनाचा समारोप

The concept of science is not only in the curriculum | विज्ञानाच्या संकल्पना केवळ अभ्यासक्रमात नको

विज्ञानाच्या संकल्पना केवळ अभ्यासक्रमात नको

Next

जळगाव : आजच्या व नव्या पिढीर्पयत विज्ञान पोहचवायचे असेल तर विज्ञानाच्या संकल्पना या केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये न राहता, त्यावर लेखन करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमामधून केवळ त्याचा अभ्यास होवू शकतो. मात्र त्याला विज्ञान कळू शकत नाही, असे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी केले.
विद्याथ्र्याना समजेल अशा भाषेत विज्ञानच नाही. तर सर्व विषय सोप्या पद्धतीने तयार करण्यात यायला हवे, अशीही अपेक्षा डॉ.पाटील यांनी व्यक्त केली. 
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद मुंबई व जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित तिस:या विज्ञान साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष तथा ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाहक अ.पां.देशपांडे, मराठी विज्ञान परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.व्ही.सोमवंशी, जिल्हा कार्यवाहक दीपक तांबोळी, कोषाध्यक्ष शशिकांत नेहते आदी उपस्थित होते. दोन दिवसीय विज्ञान साहित्य संमेलन समारोप कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहभागी लेखक व विद्याथ्र्याचा सत्कार करण्यात आला.

तरुणांर्पयत विज्ञान पोहचणे आवश्यक-कुलकर्णी
4संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, विज्ञानाचा प्रचार व्हावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेकडून विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन केले. दोन दिवसीय संमेलनात दर्दी विज्ञान प्रेमींची उपस्थित राहिली असली तरी  ती बोटावर मोजण्याइतपतच होती. ज्या उद्देशाने विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते त्या उद्देशासाठी संमेलनात तरुणांची उपस्थिती महत्वाची होती.  तरुणांर्पयत विज्ञान पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभार प्रा.सुनिल गरुड यांनी मानले.

4डॉ.के.बी.पाटील म्हणाले की, विज्ञानाचा झपाटय़ाने विकास होत आहे. तसेच या आधुनिक काळात स्पर्धा देखील वाढत आहे व या स्पर्धेत पालक वर्ग आपल्या पाल्यांना ढकलत आहे. यामुळे पाल्यांचा खरा विकास होवू शकत नाही. पालक वर्गाने प्राथमिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीची सक्ती करायला नको.
तसेच विद्याथ्र्याना समजेल अशा भाषेत विज्ञानच नाही. तर सर्व विषय सोप्या पद्धतीने तयार करण्यात यायला हवे.  अ.पां.देशपांडे म्हणाले की, वैज्ञानिक संशोधनाचा वापर हा समाजासाठी होणे गरजेचे आहे.


तरुणांर्पयत विज्ञान पोहचणे आवश्यक-कुलकर्णी
संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, विज्ञानाचा प्रचार व्हावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेकडून विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन केले. दोन दिवसीय संमेलनात दर्दी विज्ञान प्रेमींची उपस्थित राहिली असली तरी  ती बोटावर मोजण्याइतपतच होती. ज्या उद्देशाने विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते त्या उद्देशासाठी संमेलनात तरुणांची उपस्थिती महत्वाची होती.  तरुणांर्पयत विज्ञान पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभार प्रा.सुनिल गरुड यांनी मानले.
 

Web Title: The concept of science is not only in the curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.