दोन कुटुंबांसाठी एका शौचालयाची संकल्पना
By admin | Published: January 25, 2017 12:44 AM2017-01-25T00:44:06+5:302017-01-25T00:44:06+5:30
वरणगाव पालिका प्रशासनाकडून काम सुरू : मागणी वाढल्याने प्रशासन अडचणीत
वरणगाव : शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंजूर अनुदानित शौचालयापेक्षा शहरवासीयांकडून मागणी अर्ज जास्त प्रमाणात दाखल झाल्याने नगरपालिका प्रशासनापुढे अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान दोन कुटुंब मिळून एक शौचालय या संकल्पनेवर पालिका काम करीत आहे.
शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने शुभारंभ केला आहे. तीन टप्प्यात शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडून करण्यात येत आहे.
शहरात 1 हजार 800 कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे सव्रेक्षणात आढळून आले आहे. त्यापैकी 600 कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 600 व्यक्तिगत शौचालय मंजूर करण्यात आले आहेत.
त्यापैकी शेकडो शौचालय उभारणीच्या अंतिम टप्प्यात आहेत.
जनजागृतीचा प्रभाव
नगरपालिकेने स्वच्छ अभियान राबविताना सुरुवातीस कर्मचारी व आशा स्वयंसेवी महिलांकडून शहरवासीयांमध्ये जनजागृती करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. शहरवासीयांनीही त्यांना प्रतिसाद देत शौचालय उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. शासनाने मंजूर केलेल्या अनुदानित शौचालयापैकी शौचालयाची मागणी करणा:यांची संख्या अधिक असल्याने शिवाय जागेअभावी शौचालय उभारणीस अडचण आल्याने त्यावर नगरपालिका प्रशासनाने दोन कुटुंब मिळून एक शौचालय ही संकल्पना नागरिकांसमोर मांडून त्यावरही कामकाज करण्यात येत आहे.
गुडमॉर्निग पथकाचा फंडा
नैसर्गिक विधीस उघडय़ावर बसणा:या नागरिकांना जागेवर स्वच्छतेची माहिती पटवून देत तेथेच त्या कुटुंबाचा शौचालय अनुदानीत मागणी अर्ज भरून घेतला जात आहे. त्यानंतर त्या कुटुंबाकडील जागेची पाहणी करताच मंजुरी देण्यात येत असल्याने नगरपालिकेला प्राप्त अनुदानित शौचालयापेक्षा व्यक्तिगत शौचालयाची मागणी वाढली आहे. यावर उपाय म्हणून 14 व्या वित्त आयोगाचा निधी तात्पुरत्या स्वरुपात अनुदान वाटपासाठी करण्यात येइल. पुढील स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत शौचालयाचे अनुदान प्राप्त होताच ते अनुदान 14 वित्त आयोगाच्या निधीत जमा करण्यात येईल, अनुदानासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान थांबू देणार नसल्याचे नगर पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(वार्ताहर)
भुसावळ तालुक्यातील सर्वात मोठे आणि नगरपालिकेचे शहर म्हणून वरणगाव शहराची नवीन ओळख निर्माण झाली आहे.शहराच्या मध्यातून आशिया महामार्ग जातो. शिवाय नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर वरगाव शहर असल्याने या शहराला महत्त्व आहे.असे हे शहर हगणदारीमुक्त होण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मोठे प्रय} सुरू झाले आहेत. सिद्धेश्वरनगर हा भाग शहरातील सर्वात मोठा झोपडपट्टीचा भाग आहे.याच ठिकाणी वैयक्तीक आणि सार्वजनिक शौचालयाची गरज भासणार आहे.दरम्यान,शौचालयांची मागणी वाढली आहे.म्हणजे या ठिकाणी लोकांमध्ये हगणदरीमुक्तीबाबत चांगलीच जागृती झाली आहे.त्यामुळे शहरवासीयांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रस्ताव आले आहेत.
शौचालयांची मागणी: वाढली..
4शहरवासीयांनीही त्यांना प्रतिसाद देत शौचालय उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. शासनाने मंजूर केलेल्या अनुदानित शौचालयापैकी शौचालयाची मागणी करणा:यांची संख्या अधिक असल्याने शिवाय जागेअभावी शौचालय उभारणीस अडचण आल्याने त्यावर नगरपालिका प्रशासनाने दोन कुटुंब मिळून एक शौचालय ही संकल्पना नागरिकांसमोर मांडून त्यावरही कामकाज करण्यात येत आहे.
शहरवासीयांनी योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून शहर हगणदारीमुक्त लवकर केले जाईल. ज्या कुटुंबांकडे व्यक्तिगत शौचालय आहे. उघडय़ावर शौचास जाणा:यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. उघडय़ावर शौचास न जाता सार्वजनिक शौचालायाचा वापर करावा.
- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी,वरणगाव, नगरपालिका. वरणगाव.