समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:22 PM2017-08-29T16:22:01+5:302017-08-29T16:22:45+5:30

लोकमतच्या ‘वीकेण्ड’ पुरवणीमधील प्रदीप रस्ते यांचा लेख

Concluded | समारोप

समारोप

googlenewsNext

अगदी काही महिनेच आधी हाती आलेले स्केचबूक आणि त्यातील काही रेषा मी गेले तीन महिने आपल्यासमोर ठेवत होतो. त्या रेषा- त्या वेळेसचे डोक्यातले विचार आणि ते शब्दबद्ध करणे हा सिलसिला आता स्वल्पविरामी होतो आहे. हा माङयासाठी फारच मनभावन ठरला. आपण मला अनेक मार्गानी प्रोत्साहित केले. ‘लोकमत’चे हे पान सजवणारे आणि संपादक मंडळ हेदेखील माङो दरम्यान चांगले मित्र झालेत. मी हे माङो मोठे भाग्य समजतो आणि कृतज्ञतेने आपणास नमस्कार करतो. दर आठवडय़ास आपणास भेटताना ‘कलाभान’ वाढावे हा एकमेव हेतू होता. प्रत्येक एक व्यक्ती ही सोबत एखादी कला घेऊनच जन्मास येते. काही ती जाणून मोठे होतात. लौकिक मिळवतात. मात्र अनेकांना (आणि हे प्रमाण खूपच मोठे) आपल्यातला तो स्पार्क समजतच नाही. त्याची जी काही कारणे आहेत त्यात नको शिरायला. पण बहुतांशी असेच होते की आपण दैनंदिन रहाटगाडग्यात आपली कला विसरून जातो. तसे ते होऊ नये यासाठी मला जे शक्य होते ते मी येथे फार मनोभावे केले. अगदी एखाद्याला जरी त्याचा उपयोग होऊन तो काही करायला लागला असेल तर माझा उद्देश सफल झाला, असे मला वाटते. कलेबाबत जेव्हा मी बोलतो तेव्हा तो शब्द र्सवकष अर्थाने मी घेतला आहे हे मला आपणास सांगायचे आहे. अगदी साधे हसणे ही फार मोठी कला आहे. सुहास्य वदनाने जर आपण अगदीच अनोळखी व्यक्तीस पहिल्यांदाच भेटलो तर आपली ही अगदी सहज-साध्य कला जादू करते. आता ती पुढेदेखील नेऊ शकते. सुहास्य वदन-थोडी टापटीप आणि थोडे बोलणे आणि त्यात थोडे शास्त्र आणले की, या जगात आपण कोणतीही वस्तू विकू नाही शकणार का? कला अंगीकारणे याही दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. कला आणि कलाकार वाढीस लागणे म्हणजे अगदी आपोआपच हे जग सुंदर होणे.. मला थोडीफार रेषा काय यायला लागली. (उशिराने का असेना!) तिने मला आपल्या दिवाणखान्यात नेले! मी आपला झालो. माझी एक वेगळी ओळख झाली. येथे सांगितले पाहिजे की आपण जे हे माङो सततचे ‘मी- माङो’ असे बोलणे आहे, त्यास विसरून जा. स्वानुभव खरा असतो म्हणून मी- माङो! बाकी मी अगदी म्हणजे अगदीच आपल्यातीलच एक आहे हे कृपया सांगू देत. असो. तर मी सांगत होतो- कोणतीही कला जर आपण तिला घट्ट चिकटून राहिलो तर ती एक दिवस व्यक्तीला निश्चित मोठे करते. मला येथे एक इंग्रजी वाक्य आपणासंगे शेअर करायचे आहे. अफळ कर टवउ छएरर कटढडफळअठळ ळअठ छकऋए, इवळ हअळ अ ढडडफ छकऋए हकळडवळ कळ.. हे जे आपल्या डोक्यावर अथांग पसरलेले आभाळ आहे नां, त्यापेक्षा कितीतरी मोठे असे कलेचे अंतरिक्ष आहे. आपण त्याचा किंचितसा जरी भाग झालो तर सारे आभाळ आपल्या कवेत येते! आपणास ती एक छोटीशी गोष्ट माहिती असेल. एका राजास गरुडाची डौलदार, देखणी, सुंदर दोन पिल्ले भेट मिळालीत. राजाने विचार केला. ही मोठी होतील आणि आपल्या राजचिन्हाला साजेशी होतील. प्रशिक्षक नेमला गेला. पिल्ले ‘शिक्षित’ व्हायला लागलीत. नंतर त्यांची परीक्षा घेण्याची वेळ आली. त्या दोहोतील एकाने उंच आकाशात विहार केला. दुसरा तो गरुड होता तो थोडा उडाला आणि जवळच्या एका फांदीवर जाऊन बसला. असेच परत पुढच्या वर्षीही झाले. प्रशिक्षक बदलला तरी तसेच. एक उंच आकाशात, दुसरा फांदीवर. राजाला समजेना. अर्थातच मग त्याने दवंडी पिटली, दुस:या गरुडास उंच उडवणा:यास बक्षीस जाहीर केले. एके दिवशी आपल्या गच्चीवर उभा असताना त्याला दुसरा गरुडसुद्धा उडताना दिसला. हे विहंगम दृश्य त्याला आनंद देते झाले! हे कसे झाले? राजाला कळेना हा दुसरा गरुड उडायला कसा लागला? त्याने प्रधानास बोलावले. प्रधानाने राजासमोर एका साध्याशा शेतक:याला उभे केले. राजाने त्याला ते मोठे बक्षीस दिले. विचारले- ‘‘भले भले थकलेत, तू असे काय केलेस?’’ शेतकरी नम्रपणे म्हणाला- ‘‘आपली उपजत कला विसरलेल्या त्या गरुडास ज्या फांदीवर बसायची सवय लागली होती. ती फक्त मी तोडून टाकली. मला बक्षीस नको!’’

Web Title: Concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.