भोळे महाविद्यालयात चर्चासत्राचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 04:29 PM2020-08-22T16:29:36+5:302020-08-22T16:29:57+5:30
भोळे महाविद्यालयात पाच दिवसीय आंतरशाखीय चर्चासत्राचा समारोप २१ रोजी झाला.
भुसावळ : भोळे महाविद्यालयात पाच दिवसीय आंतरशाखीय चर्चासत्राचा समारोप २१ रोजी झाला.
याप्रसंगी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.शशिकला वंजारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डीन डॉ.संजीव सोनवणे, कॉम्प्युटर सोसायटी इन इंडियाचे अध्यक्ष रामकृष्ण व्यास, सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक उपस्थित होते.
कुलगुरू डॉ.शशिकला वंजारी यांनी सांगितले की , अचानक कोरोनामुळे लॉडाऊन झाले व सर्वाना आॅनलाईन हाच पर्याय समोर आला व शिक्षणात अचानक बदल घडून आला व त्याला आपण समोर जात आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी सामाजिक दुरी ठेऊन शिक्षण सुरू केले आहे. यामध्ये लार्ज ग्रुप तयार करून शिक्षण देत आहेत व त्याचे फायदेसुद्धा दिसून येतात,
मान्यवरांसह डॉ.सनी हसानी, जसंदीपकौर फुल, पी.कार्तिका, अकबर मोहम्मद श्रेयल घोष, सुप्रियो हलदर आदींनी मनोगत व्यक्त केले.
पाच दिवसात १९० जणांनी सहभाग घेतला. ४७ संशोधक यांनी संशोधन पेपर सादर कीले.
पाच दिवसीय आंतरशाखीय चर्चासत्राचे उदघाटन प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्या हस्ते झूमच्या माध्यमातून आॅनलाईन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील संचालक प्रा.डॉ.कविता साळुंके उपस्थित होत्या
सूत्रसंचालन प्रा.अंजली पाटील, प्रा.डॉ.जे.बी.बागुल, यांनी केले. प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर यांनी आभार मानले. करण नाईक, ज्योती लष्करी व सर्व आयोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले, असे आयोजन सचिव व प्रसिद्धप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कळविले आहे.