बोदवडमध्ये मोहरम पर्वाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 10:57 PM2020-08-30T22:57:46+5:302020-08-30T22:57:58+5:30

हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या बोदवड येथील मोहरमच्या चार दिवशीय सवारीच्या शेवटचा करबला करीत समारोप झाला.

Conclusion of Moharram Parva in Bodwad | बोदवडमध्ये मोहरम पर्वाचा समारोप

बोदवडमध्ये मोहरम पर्वाचा समारोप

googlenewsNext

गोपाळ व्यास
बोदवड : हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या बोदवड येथील मोहरमच्या चार दिवशीय सवारीच्या शेवटचा करबला करीत रविवारी समारोप झाला.
तहसीलदार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक भाईदास मालचे यांच्यासह प्रशासनाच्या नियंत्रणाने कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पडला. यासाठी गांधी चौक परिसररातील दर्ग्यामध्ये सर्व सवारींचा समारोप करण्यात आला. त्यामध्ये शहरातील समस्त मोहरम उत्सव समितीच्या सदस्यांनी प्रशासनाचे आभारही मानले. एरव्ही शेवटच्या मिरवणुकीत येथे गर्दीचा महापूर असतो. मात्र यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा करण्यावर निर्बंध आले होते.

Web Title: Conclusion of Moharram Parva in Bodwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.