स्वामी समर्थ नगर व गणाबाप्पा नगर रस्ते काॅंक्रीटीकरणाला सुरुवात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:14+5:302021-08-29T04:19:14+5:30
धरणगाव नगरपालिका हद्दीतील स्वामी समर्थ नगर गट क्रमांक ३०६मध्ये रस्ते काॅंक्रीटीकरण करणे, गनाबाप्पा नगर गट क्रमांक ३०५मध्ये रस्ते काॅंक्रीटीकरण ...
धरणगाव नगरपालिका हद्दीतील स्वामी समर्थ नगर गट क्रमांक ३०६मध्ये रस्ते काॅंक्रीटीकरण करणे, गनाबाप्पा नगर गट क्रमांक ३०५मध्ये रस्ते काॅंक्रीटीकरण करणे अशा दोन्ही रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी १ कोटी १७ लक्ष निधी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नगरोत्थान मधून मंजूर करण्यात आला आहे. नुकतीच या कामाची वर्कऑर्डर काढण्यात आली असून पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याहस्ते दोन्ही रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, नगरपालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध व नियोजन करून कामे करावी, शहरातील हातात घेतलेली संपूर्ण कामे पूर्ण करणार असून स्वामी समर्थ नगरातील खुल्या जागेचा विकास करणार आहे. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. धरणगाव शहरात विविध प्रकारचे विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याने विरोधक केवळ विरोधाला विरोध म्हणून राजकारण करत असल्याची टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली.
यावेळी बालकवयित्री देवश्री महाजन हिचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
दोन शिवसेना शाखा फलकांचे अनावरण
शहरातील जैन गल्ली व बालाजी गल्ली येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील व सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्याहस्ते शिवसेना शाखा फलकांचे अनावरण करण्यात आले. जैनगल्ली शाखा प्रमुख म्हणून राजमाल संचेती, अक्षय मुथा यांची तर बालाजी गल्ली येथे गणेश महाजन यांची शाखा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील व सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सत्कार केला.
यावेळी नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, न. पा. गटनेते पप्पू भावे, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, संजय पवार, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, नगरसेवक विलास महाजन, विजय महाजन, अरुण पाटील, अनुपम अत्तरदे, व्ही. आर. पाटील, कैलास महाजन, किरण पाटील, कार्तिक मोरे, भूषण माळी, ज्ञानेश्वर माळी, सुरेश चौधरी, उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार उपस्थित होते. प्रास्ताविक परमेश्वर रोकडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार कैलास पवार यांनी मानले.
280821\img-20210828-wa0092.jpg~280821\28jal_4_28082021_12.jpg
फोटो कॅप्शन: भूमिपूजन करतांना गुलाबराव पाटील व कॉलनीवासीय~भूमिपूजन करतांना गुलाबराव पाटील व कॉलनीवासीय.