जिल्ह्यात रुग्णवाहिकांची स्थिती जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:38+5:302021-02-07T04:15:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात शासकीय रुग्णवाहिकांची संख्या अगदीच नगण्य असून लोकसंख्येच्या मानाने या रुग्णवाहिका अत्यंत कमी आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात शासकीय रुग्णवाहिकांची संख्या अगदीच नगण्य असून लोकसंख्येच्या मानाने या रुग्णवाहिका अत्यंत कमी आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या ३५ रुग्णवाहिका आहेत. तर ग्रामीण रुग्णालयांना २२ रुग्णवाहिका आहे. नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा झालेली होती, मात्र, जिल्ह्याला नवीन रुग्णवाहिका मिळालेल्या नाहीत. आहेत त्या रुग्णवाहिकांवरच अधिक भार असल्याचे चित्र आहे. शिवाय त्यात कोविड व नॉन कोविड अशा दोन्ही सेवा एकाच वेळी द्यावा लागत आहे. खासगी रुग्णवाहिकांचे दर सामान्यांना परवडत नसल्याने गरीब, गरजू रुग्णांना शासकीय रुग्णवाहिकांवरच अवलंबून राहावे लागते.
अशी आहे रुग्णवाहिकांची स्थिती
जिल्हाभरात २ प्रकारच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका आहेत. त्यात बेसिक लाइफ सपोर्ट आणि ॲडव्हान्स असे रुग्णवाहिकेचे प्रकार आहेत. जिल्हाभरात ३५ रुग्णवाहिका कार्यरत आहे. त्यात ९ ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट व २६ बेसिक लाइफ सपोर्ट प्रकारातील आहेत. ९ पुर्वी रुग्णवाहिका कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या व इतर रुग्णवाहिका प्रसूती, सर्पदंश, अपघात, विषप्राशन केलेल्या रूग्णांच्या तातडीच्या सेवेसाठी तैनात होत्या. कालांतराने अन्य रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पूर्ण ३५ रुग्णवाहिका या कोविड व कोविड नसलेल्या रुग्णांना अशा दोन्ही रुग्णांना रुग्णवाहिका सॅनिटाइज करून वापरली जात आहे.