गुलाबराव देवकरांसह वाणींची जळगाव बंदीची अट शिथिल

By admin | Published: January 21, 2017 12:15 AM2017-01-21T00:15:24+5:302017-01-21T00:15:24+5:30

जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर व जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जातील जळगाव बंदीची अट सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केली आह़े

The condition of ban on the Jalgaon ban is also looser with Gulabrao Devkar | गुलाबराव देवकरांसह वाणींची जळगाव बंदीची अट शिथिल

गुलाबराव देवकरांसह वाणींची जळगाव बंदीची अट शिथिल

Next


धुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आरोपी माजी मंत्री गुलाबराव देवकर व जगन्नाथ वाणी यांच्या जामीन अर्जातील जळगाव बंदीची अट सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केली आह़े दोघांचा यासंदर्भात दाखल अर्ज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला़
सर्वोच्च न्यायालयाने गुलाबराव देवकर यांना यापूर्वीच जामीन मंजूर केला आह़े मात्र तो मंजूर करताना जळगाव बंदीची अट घालण्यात आली होती़
दरम्यान, धुळे येथील विशेष न्यायालयात जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज सुरू आह़े त्यात पुराव्याचे कामकाज पूर्ण झालेले आह़े, त्यामुळे देवकर यांच्या जामीन अर्जातील जळगाव बंदीची अट शिथिल करावी, असा अर्ज त्यांच्याकडून अॅड़ सुधांशू चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश चलमेश्वर यांच्याकडे दाखल केला होता़
त्यावर शुक्रवारी कामकाज झाल़े   न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला आहे, अशी माहिती अॅड़ सी़ डी़ सोनार यांनी दिली़
तसेच जगन्नाथ वाणी यांनाही यापूर्वीच जामीन मिळालेला आह़े त्यांनाही जळगाव बंदीची अट घालण्यात आली होती़ त्यांचादेखील जळगाव बंदीची अट शिथिल करण्याबाबतचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे, अशी माहिती त्यांचे वकील प्रमोद पाटील यांनी दिली़

Web Title: The condition of ban on the Jalgaon ban is also looser with Gulabrao Devkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.